Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत रक्तस्त्राव खूप कमी होतो? आहारात नियमित हवे ५ पदार्थ- तब्येतही सुधारेल लवकर...

मासिक पाळीत रक्तस्त्राव खूप कमी होतो? आहारात नियमित हवे ५ पदार्थ- तब्येतही सुधारेल लवकर...

5 Foods For Scanty Periods : Tips To Increase Period Blood Flow : foods for better period flow : best foods for period blood flow : How to improve menstrual blood flow naturally : मासिक पाळीत रक्तस्त्राव योग्य प्रमाणांत होत नसल्यास डाएटमध्ये 'हे' ५ पदार्थ नक्की खा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 16:16 IST2025-08-18T15:13:01+5:302025-08-18T16:16:05+5:30

5 Foods For Scanty Periods : Tips To Increase Period Blood Flow : foods for better period flow : best foods for period blood flow : How to improve menstrual blood flow naturally : मासिक पाळीत रक्तस्त्राव योग्य प्रमाणांत होत नसल्यास डाएटमध्ये 'हे' ५ पदार्थ नक्की खा...

5 Foods For Scanty Periods foods for better period flow best foods for period blood flow How to improve menstrual blood flow naturally | मासिक पाळीत रक्तस्त्राव खूप कमी होतो? आहारात नियमित हवे ५ पदार्थ- तब्येतही सुधारेल लवकर...

मासिक पाळीत रक्तस्त्राव खूप कमी होतो? आहारात नियमित हवे ५ पदार्थ- तब्येतही सुधारेल लवकर...

दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील अविभाज्य भागच आहे. मासिक पाळी संबंधित (best foods for period blood flow) अनेकजणींना काही ना काही समस्या कायम असतात. आजच्या काळात चुकीची लाईफस्टाईल, जास्त ताण आणि अयोग्य आहार यामुळे महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनियमित मासिक (foods for better period flow) पाळी, पोषक तत्वांची कमतरता, जास्त ताण किंवा पीसीओएस (PCOS) आणि पीसीओडी (PCOD) सारखे आजार होऊ शकतात, ज्यामध्ये मासिक पाळीचा रक्तप्रवाह कमी होण्याची समस्या येते( How to improve menstrual blood flow naturally).

मासिक पाळी दरम्यान रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही किंवा काहीजणींच्या बाबतीत ब्लड ग्लो अतिशय कमी होतो. जर ब्लड फ्लो योग्य पद्धतीने न झाल्यास, या समस्येमुळे महिलांना अनेकदा थकवा, मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, पाठदुखी, डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास होतो. परंतु काळजी न करता आपण आपल्या आहारात आणि खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करून मासिक पाळीत होणारा ब्लड फ्लो सुधारु शकतो. यावर उपाय म्हणून, जयपूर येथील एंजेलकेअर न्यूट्रिशन अँड वेलनेस सेंटरच्या (Angelcare-A Nutrition and Wellness Center) संचालक, आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ अर्चना जैन यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत, मासिक पाळीतील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी काय खावे याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. 

मासिक पाळीतील ब्लड फ्लो योग्य पद्धतीने होण्यासाठी काय खावं ?

१. हिरव्या पालेभाज्या :- मासिक पाळीत योग्य पद्धतीने ब्लड फ्लो होण्यासाठी, आपल्या आहारात, मेथी आणि पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. याशिवाय, बीटसारखी कंदमुळं देखील आहारात नियमितपणे खावीत. या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह (Iron) असते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि मासिक पाळीचा ब्लड फ्लो देखील चांगला होतो.

सण - उत्सवाला तळण तर होणारच, कोणतं तेल तळण्यासाठी चांगलं? तेलकट खाऊनही बिघडणार नाही तब्येत...

२. फळे :- मासिक पाळीतील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी, संत्री, द्राक्षे, किवी, डाळिंब आणि लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन-सी आणि लोह (Iron) युक्त फळांचा आहारात समावेश करावा. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

३. सुकामेवा :- मासिक पाळीतील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी, महिलांनी अक्रोड, खजूर, मनुके आणि अंजीर यांसारख्या सुक्यामेव्याचा आहारात समावेश करावा. यामध्ये चांगल्या प्रमाणात लोह (iron) आणि हेल्दी फॅट्स असतात, जे मासिक पाळीचा फ्लो सुधारण्यासोबतच त्यादरम्यान येणारी सूज कमी करण्यास मदत होते. 

वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक प्यावे? कुणासाठी काय चांगलं, कशानं वाटेल फ्रेश...

४. सीड्स :- मासिक पाळीतील रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नसल्यास, आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक बियांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. अळशी, भोपळा आणि चिया सीड्समध्ये चांगल्या प्रमाणात हेल्दी फॅट्स आणि इतर अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे मासिक पाळीदरम्यान येणारी सूज कमी होण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते.

वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय....

५. धान्य :- मासिक पाळीतील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी, ब्राऊन राईस, ओट्स आणि गहू यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त धान्यांचा आहारात समावेश करावा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Web Title: 5 Foods For Scanty Periods foods for better period flow best foods for period blood flow How to improve menstrual blood flow naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.