Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menopause > Perimenopause : सगळ्यांनाच होतं, त्यात काय एवढं? असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही मेनोपॉज, प्रत्येकीचा त्रास वेगळा...

Perimenopause : सगळ्यांनाच होतं, त्यात काय एवढं? असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही मेनोपॉज, प्रत्येकीचा त्रास वेगळा...

Signs of Perimenopause : वयाच्या तिशीत असाल तरी माहिती हवं पुढे आपलं शरीर कसं बदलू शकतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2026 06:00 IST2026-03-08T06:00:00+5:302026-03-08T06:00:02+5:30

Signs of Perimenopause : वयाच्या तिशीत असाल तरी माहिती हवं पुढे आपलं शरीर कसं बदलू शकतं.

signs of Perimenopause and menopause how to help women and how to deal with it? | Perimenopause : सगळ्यांनाच होतं, त्यात काय एवढं? असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही मेनोपॉज, प्रत्येकीचा त्रास वेगळा...

Perimenopause : सगळ्यांनाच होतं, त्यात काय एवढं? असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही मेनोपॉज, प्रत्येकीचा त्रास वेगळा...

डॉ. प्रिया प्रभू (सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज)

आज एक फोन आला . बऱ्याच दिवसानंतर आला होता. त्यामुळे “सध्या काय चाललंय?” हा हमखास असणारा प्रश्न विचारला गेला. “नवीन काही करता की नाही?” हा प्रश्नपण होता सोबत. मी म्हटले , “नाही, नवीन काही करण्याची एनर्जी आणि इच्छा नाहीये, आता मी पेरीमेनोपॉजमध्ये (रजोनिवृत्तीच्या आधीचा काळ) आहे ना.. ” त्यानंतर मात्र मला सांगण्यात आले की ” हे तर सर्व स्त्रियांमध्ये होते, त्यात काय आहे ? त्याचे काही त्रास होतात मात्र थोडा काळ असतात. जर त्रास जास्त वाटत असेल तर मग हार्मोनची गोळी घ्यायची. हार्मोन रिप्लेसमेंट केले की बरे वाटते. …. वगैरे” मी फोन बंद केला कारण काही समजावण्याची एनर्जी नव्हती. एखादी तापाची गोळी घ्यावी त्याप्रमाणे तो सल्ला सहजपणे दिला गेला होता. वैद्यकीय क्षेत्रातील लिंगभाव याविषयी शिकल्यानंतर नवनवीन बाबी समजत गेल्या(Signs of Perimenopause).

स्त्रियांच्या त्रासाकडे व आजारांकडे कसे नकळत दुर्लक्ष होते किंवा ते कमी समजले जातात हे जाणवले. आता न्यूरोडायव्हरसिटीबद्दल माहिती घेताना रजोनिवृत्तीचे महत्व वेगळ्या प्रकारे समजले. तुम्ही तिशी – चाळीशीच्या असाल तर तुम्हाला परिमेनोपॉजच्या त्रासाचा अनुभव असेलच.. हो ना? याची कमाल अशी आहे की हा काळ नेमका कधी सुरू होतो हे पाळी थांबल्यानंतरच समजते.. कारण याची व्याख्या अशी आहे की पाळी थांबण्यापूर्वी साधारण सात ते दहा वर्षे हा त्रास असू शकतो. त्यामुळे याची सुरुवात नेमकी कधी झाली हे आपण ओळखू शकत नाही. जेव्हा त्रास हळूहळू वाढत जातात तेव्हा ते नॉर्मलच वाटायला लागतात. आणि थोडी थोडके नाही तर तब्बल दहा वर्षे हे सर्व त्रास सहन करावे लागतात.शरीराच्या प्रत्येक अवयवांमध्ये बदल होऊ लागतात. विविध तक्रारी वाढू लागतात. फक्त शरीरातच नाही तर मनामध्ये बदल घडतात. आधी जसे होतो ते आपणच का.. असा प्रश्न पडतो(signs of Perimenopause and menopause how to help women and how to deal with it?).


जसा प्रत्येकीचा प्रवास हा वेगवेगळ्या वयामध्ये सुरू होऊ शकतो, त्याचप्रमाणे प्रत्येकीला होणारा त्रास आणि त्याचे प्रमाण हे देखील वेगवेगळे असू शकते. म्हणजे आपण कोणत्याही अनुभवांची 100% तुलना करू शकत नाही. मैत्रिणींचे अनुभव बघून मला वाटायचे की अरे मला काही जास्त त्रास होत नाहीये, पण माझा त्रास नंतर उशिरा सुरू झाला आणि मग समजले की तो कसा असतो आणि किती असतो.
सर्वसाधारणपणे अनियमित पाळी, खूप जास्त रक्तस्त्राव किंवा कमी रक्तस्त्राव, पाळीच्या वेळच्या इतर तक्रारी, हॉट फ्लशेस, रात्री घाम येणे, झोप न येणे, चिडचिडेपणा , मूड स्विंग्ज, विसरभोळेपणा, डिप्रेशन , लघवीच्या जागी खाज येणे, योनीमार्गाचा दाह, लैंगिक संबंधांची इच्छा कमी होणे, डोकेदुखी, केस कोरडे होणे किंवा गळणे इ त्रासांबाबत सर्वांना माहित आहे. पण याखेरीज देखील कितीतरी वेगवेगळे त्रास हे स्त्रियांना होत असतात. जर तुम्ही सर्च केले तर २२ लक्षणे , ३४ लक्षणे, ५५ लक्षणे अशा प्रकारे तुम्हाला याद्या दिसतील. सोबतच्या फोटोमध्ये अजून काही लक्षणांची माहिती दिली आहे.

त्यामुळे तुम्हाला स्वतःला जेव्हा यातील त्रास जाणवू लागतील (३० – ४० वयानंतर) त्या वेळेला आपण पेरीमेनोपॉज मध्ये आहोत हे समजून घ्या. जर त्रास होत असतील तर असे होतेच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला व उपचार घ्या.
त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबीयांसोबत आपला त्रास शेअर करा. त्यासाठी त्यांच्याकडून मदत मिळवा. कारण थांबणाऱ्या पाळीला कोणी थांबवू शकत नाही. ती थांबणारच आहे. आणि तत्पूर्वी कमी होत जाणारे हार्मोन्स त्यांचे परिणाम दाखवणारच आहेत .
ते त्रास सुसह्य होण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी प्रयत्न करायला हवेत. कमीत कमी ‘ जेव्हा घरातील स्त्री जेव्हा सांगते की तिला त्रास होतोय , त्या वेळेला तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणे ‘ ही एक गोष्ट तरी आपण सर्व नक्कीच करू शकतो. तिने सांगितले जरी नाही तरी चाळिशीतील स्त्रियांना यातील काही ना काहीतरी त्रास होत असणार आहेत हे जाणून त्यांची काळजी घ्यायला हवी. विशेषतः त्या जर नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील तर अशावेळी त्यांना कुटुंबीयांकडून अधिक आधाराची गरज असते. पाळी थांबण्यापूर्वीच्या काळात काय काय त्रास होतात याविषयी अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही पूर्ण माहिती नाही. त्यामुळे स्त्रियांचे अनुभव महत्त्वाचे समजून त्यानुसार आपण विविध उपायोजना करायला हव्यात . त्या काळामध्ये पौष्टिक अन्न, प्रोटीन्स,फायबर्स योग्य प्रमाणात खायला हवेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांनी आपले शरीर आणि त्या शरीरातील बदल समजून घेऊन जे काही त्रास जाणवतात ते कमी होण्यासाठी नैसर्गिकपणे काय उपाय करता येतील याचाही विचार करावा. आवश्यक ती विश्रांती मिळाली की नक्कीच या काळामध्ये अधिक आनंदी जगता येईल. यापुढे एखादी स्त्री तिचे  पेरीमेनोपॉजबाबतचे त्रास सांगत असेल तर तिचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकाल ना?

Web Title : पेरीमेनोपॉज: एक अनोखा अनुभव, इसे 'सिर्फ मेनोपॉज' समझकर अनदेखा न करें।

Web Summary : पेरीमेनोपॉज हर महिला को अलग तरह से प्रभावित करता है। लक्षण अलग-अलग होते हैं और वर्षों तक रह सकते हैं। परेशानी को अनदेखा न करें; विशेषज्ञ सलाह और परिवार से समर्थन लें। जीवनशैली में बदलाव, जिसमें आहार और आराम शामिल हैं, कल्याण के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Perimenopause: A unique experience, not to be ignored as 'just menopause'.

Web Summary : Perimenopause affects every woman differently. Symptoms vary and can last for years. Don't dismiss discomfort; seek expert advice and support from family. Lifestyle adjustments, including diet and rest, are crucial for wellbeing.