Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अलार्म लावून उठण्याची सवय जीवघेणी! वेळेत उठाल पण भविष्यात सतावतील अनेक शारीरिक समस्या...

अलार्म लावून उठण्याची सवय जीवघेणी! वेळेत उठाल पण भविष्यात सतावतील अनेक शारीरिक समस्या...

Your Alarm Clock Might Be Harming Your Health : why you should not wake up to an alarm why it is silent killer know how to change this habit : अलार्मवर लावून उठण्याची सवय आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 15:21 IST2025-05-16T15:02:38+5:302025-05-16T15:21:21+5:30

Your Alarm Clock Might Be Harming Your Health : why you should not wake up to an alarm why it is silent killer know how to change this habit : अलार्मवर लावून उठण्याची सवय आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते, ते पाहा...

Your Alarm Clock Might Be Harming Your Health why you should not wake up to an alarm why it is silent killer know how to change this habit | अलार्म लावून उठण्याची सवय जीवघेणी! वेळेत उठाल पण भविष्यात सतावतील अनेक शारीरिक समस्या...

अलार्म लावून उठण्याची सवय जीवघेणी! वेळेत उठाल पण भविष्यात सतावतील अनेक शारीरिक समस्या...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही कर्कश अलार्मच्या आवाजानेच होते. कानाजवळ सतत ठणाठणा वाजणारा हा अलार्म आपल्याला झोपेतून  जाग करत दिवसाची सुरुवात (Your Alarm Clock Might Be Harming Your Health) तर करून देतो, परंतु ही सवय आपल्याला महागात पडू शकते. खरंतर, आपण अलार्मच्या आवाजाने उठतो म्हणजेच आपण संपूर्णपणे त्या अलार्मवर अवलंबून असतो. अलार्म वाजल्यावर उठणे, ही फक्त एक सवय नसून आपल्या शरीरावर आणि मनावर खोल परिणाम करणारी वाईट सवय आहे(why you should not wake up to an alarm why it is silent killer know how to change this habit).

अनेकदा आपण सकाळी उठण्यासाठी मोबाईल किंवा घड्याळात अलार्म लावतो. सकाळी अलार्म वाजला की, तेव्हाच आपल्या दिवसाची सुरुवात होतो. पण ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अलार्म वाजवून उठण्याची सवय तुम्हाला अनेक आजारांना बळी पाडू शकते... अलार्मच्या माध्यमातून आपण नैसर्गिक झोपेच्या चक्रात ढवळाढवळ करतो. परिणामी, मानसिक तणाव, चिडचिड, थकवा, आणि झोपेची अपूर्णता ही अनेक समस्या आपल्याला नकळत भेडसावू लागतात. संशोधनही दाखवून देतं की सतत अलार्मवर अवलंबून राहणं ही दीर्घकाळात आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अलार्मवर लावून सकाळी उठण्याची सवय आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते, ती का टाळली पाहिजे, आणि त्याऐवजी आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय कोणते आहेत, ते पाहूयात... 

अलार्म लावून उठण्याच्या सवयीने  नेमकं होत काय ? 

१. स्ट्रेस अचानक वाढतो :- दिल्लीतील एका प्रसिद्ध रुग्णालयातील डॉ. संजय गुप्ता म्हणतात की, जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा त्या व्यक्तीची झोप अचानक तुटते यामुळे आपल्या शरीरातील झोपेचे घड्याळ बिघडू शकते. अलार्मचा मोठा आवाज शरीराला लढाई किंवा आक्रमक मोडमध्ये आणतो, ज्याची गरज त्यावेळी अजिबातच नसते. जेव्हा आपल्या धोका असतो तेव्हाच शरीरात ही प्रक्रिया घडणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत शरीरावर ताण वाढतो आणि अ‍ॅड्रेनल नावाचा हार्मोन बाहेर पडतो. तसेच, कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी देखील वाढते. ज्यामुळे शरीराला अचानक जागे होण्याने धक्का देखील लागू शकतो. अलार्ममुळे झोपही बिघडते आणि जेव्हा झोपेचे चक्र बिघडते तेव्हा व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडू लागते. यामुळे, एखादी व्यक्ती चिंता किंवा नैराश्याची शिकार होऊ शकते.

हाय- हाय मिरची!वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत मिरची म्हणजे सुपरफूड, झणझणीत पण गुणकारी...

२. रक्तदाबाची समस्या वाढू शकते :- अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात या विषयावर एक अभ्यास करण्यात आला. जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या आवाजात अलार्म वाजवून जागे होते तेव्हा मेंदूच्या हालचाली तीव्र आणि वेगवान गतीने होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो, असे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. याला मॉर्निंग हायपरटेन्शन असे म्हणतात. विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, अशी सवय ७४% लोकांमध्ये दिसून आली आहे. अलार्म वाजला की ते सगळे जागे व्हायचे. तर नैसर्गिकरित्या जागे होणाऱ्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचे दिसून आले.

३. हृदयविकाराचा धोका वाढतो :- अलार्मचा संबंध हृदयविकाराशी देखील आहे. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अलार्म वाजवण्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. सकाळी अलार्मचा आवाज तात्पुरता रक्तदाब वाढवू शकतो, परंतु सकाळच्या उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो. ज्यांना आधीच हृदयरोग आहे त्यांच्यामध्ये हा धोका दुप्पट होऊ शकतो. ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या आणि सकाळी अलार्म वाजल्यावर जागे होणाऱ्यांमध्ये याचा धोका वाढतो. 

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

४.स्वभाव चिडचिडा होतो :- झोपेचा थेट संबंध आपल्या मनाशी असतो आणि त्याचा तुमच्या मनःस्थितीवर परिणाम होतो . मनःस्थिती मेंदूद्वारे नियंत्रित केली जाते. जेव्हा अलार्मच्या आवाजामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो तेव्हा मूड देखील चिडचिडा होऊ लागतो. अशा परिस्थितीत, सकाळी उठताच व्यक्तीला राग येऊ लागतो. कोणाशीही नीट बोलत नाही. जेव्हा सकाळ अशी सुरू होते तेव्हा संपूर्ण दिवस वाईट जातो.

ही सवय अशा प्रकारे बदला :- 

सकाळी अलार्म लावून उठण्याची सवय अनेक प्रकारे बदलता येऊ शकते. सगळ्यांत आधी अलार्मवर अवलंबून राहणे पूर्णपणे टाळावे. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा. जेव्हा एखादी व्यक्ती दररोज शिस्तीने झोपते आणि उठते तेव्हा त्याच्या शरीराचे अंतर्गत घड्याळ चांगल्या प्रकारे काम करू लागते. ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत सकाळी नैसर्गिक प्रकाश असावा. जेव्हा सूर्यप्रकाश खोलीत प्रवेश करतो तेव्हा मेलाटोनिन नावाचा झोपेचा संप्रेरक आपोआप कमी होतो आणि आपण लवकर उठू लागतो.

Web Title: Your Alarm Clock Might Be Harming Your Health why you should not wake up to an alarm why it is silent killer know how to change this habit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.