Breathing in fresh air : शहरातील सिमेंटच्या भींतीमध्ये बंदिस्त झालेल्या जीवनात स्वच्छ मोकळ्या हवेत श्वास घेण्यास कुणालाच वेळ नसतो. काम आणि परिवाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात बिझी झालेले लोक मोकळा श्वास घेण्यासही विसरले की काय असं वाटतं. अशात शहरातील धकाधकीच्या जीवनातून अचानक गावाकडील स्वच्छ ताज्या हवेत गेल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. आवडीचा पदार्थ समोर आल्यावर कसे लोक भसाभसा खातात, त्याप्रमाणे ही शुद्ध हवा पोटात भरून घ्यावी असं वाटतं. मन वेगळ्याच दुनियेत हरवतं. पण या प्रक्रियेला अंडरएस्टिमेट केलं जातं. ही एक नॅचरल सामान्य प्रक्रिया समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
फीट आणि निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी जसे की, एक्सरसाईज करतात, पौष्टिक आहार घेतात, फास्ट फूड बंद करतात, मद्यसेवन बंद करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेतल्यानं केवळ आनंदच मिळतो असं नाही तर यानं आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. त्यामुळे मोकळ्या हवेत श्वास घेणं ही एखादी सामान्य आनंदी देणारीच गोष्ट असं मानून चालणार नाही.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, मोकळ्या हवेत श्वास घेतल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. रोज मोकळ्या हवेत १० ते १५ मिनिटं बसल्यानं तुमचा मूड चांगला होतो, शरीरात ऑक्सीजन वाढतं, इम्यूनिटी वाढते आणि तणाव कमी होतो. ज्यामुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, आपला मेंदू आणि शरीर निसर्गाच्या सानिध्यात आराम करत असतं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या एका रिसर्चनुसार, नैसर्गिक वातावरणात वेळ घालवल्यानं तणाव, डिप्रेशनची लक्षणं कमी होतात. तर आनंदाची भावना आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. मोकळ्या हवेत श्वास घेतल्यानं काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.,
तणाव कमी होतो
मोकळ्या स्वच्छ हवेत श्वास घेतल्यानंतर मेंदुला आनंद मिळतो. ज्यामुळे मेंदुत हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात. मोकळ्या हवेत १० ते १५ मिनिटं मोठा श्वास घेतल्यानं मानसिक आरोग्य बूस्ट होतं. कारण असं केल्यास मेंदू शांत राहतो, शरीर रिलॅक्स होतं आणि मूड चांगला होता. याचा परिणाम असा की, तणाव आणि चिंतेची भावना दूर होते.
ऑक्सीजनचं प्रमाण वाढतं
मोकळ्या, ताज्या हवेत श्वास घेतल्यानं शरीरात ऑक्सीजनची लेव्हल वाढते. ज्यामुळे मेंदुला चांगल्या पद्धतीनं काम करण्यास मदत मिळते. त्याशिवाय श्वास घेण्याच्या प्रक्रियेतही सुधारणा होते.
ताज्या हवेनं इम्यूनिटी बूस्ट होते
क्वचितच हे कुणाला माहीत असेल की, ताज्या मोकळ्या हवेत श्वास घेणं संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतं. मोकळ्या हवेत श्वास घेण्याच्या रोजच्या सवयीनं इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत मिळते. ताज्या हवेत बसल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं, ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. अशात अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
सुधारते झोपेची क्वालिटी
रोज ताज्या हवेत श्वास घेतल्यानं झोपेसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानं तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारते आणि रात्री चांगली झोप येते.
पचन तंत्र सुधारतं
सकाळी मोकळ्या हवेत श्वास घेतल्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. यामुळे शरीराला पोटासंबंधी अनेक आजारांपासून वाचवलं जाऊ शकतं.