Is Excessive Yawning A Sign Of Disease : जांभई येणं म्हणजे झोप येण्याचा किंवा भूक लागण्याचा संकेत मानला जातो. पण जांभई येण्याला फक्त ही गोष्टीच कारणीभूत असतात असं नाही. एका नव्या संशोधनातून समोर आलंय की, सतत जांबई येणे सामान्य नसतं. अनेकदा शरीरात झालेल्या काही गंभीर बिघाडामुळेही जांभई येऊ लागतात. अशात हे माहीत असणं गरजेचं आहे की, सतत येणाऱ्या जांभई आपल्या आरोग्याबाबत काय सांगतात. कधी करावी चिंता?
सतत आणि कोणत्याही कारणाशिवाय येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. क्लीनिकल रिसर्चमध्ये आढळून आलंय की, जास्त जांभई येत असेल हा काही न्यूरोलॉजिकल समस्येचा संकेत असू शकतो. जसे की, मिरगी, स्ट्रोक किंवा मेंदूमध्ये इजा. काही केसेसमध्ये समोर आलंय की, सतत जांभई येणे हा फ्रंटल लोब सीजरचा भाग असू शकतो.
ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम
जांभई आपल्या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमशी निगडीत असते. ही सिस्टीम आपल्या शरीरातील अनेक अनैच्छिक कामे, जसे की, हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर आणि पचनाला कंट्रोल करते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, जास्त जांभई येणे या सिस्टीममध्ये असंतुलनाचा इशारा असू शकतो.
वैज्ञानिकांचं एक असंही मत आहे की, जांभईचा संबंध मेंदूचं तापमान नियंत्रित करण्याशी असू शकतो. जेव्हा मेंदू आपलं तापमान संतुलित ठेवण्यास संघर्ष करतो, तेव्हा जांभईच्या माध्यमातून थंड हवा आत जाते आणि ब्लड फ्लो वाढतो. स्ट्रोकच्या काही रूग्णांमध्ये असं आढळून आलंय की, जेव्हा मेंदूचं तापमान कंट्रोल करणारे भाग प्रभावित झाले, तेव्हा जास्त जांभई आल्या. यावरून असा संकेत मिळतो की, हा शरीराचा एकप्रकारचा कूलिंग मेकॅनिज्म असू शकतो.
इतरही काही कारणे
खरंतर सतत जांभई येणे धोक्याची घंटा नाही. कमी झोप, जास्त काम आणि थकवा याची मुख्य कारणं असतात. जर सतत जांभई येत असेल, विनाकारण येत असेल सोबतच चक्कर येणे, कमजोरी किंवा विचार करण्यात वा समजण्यात बदल यांसारखी लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांना भेटा.
Web Summary : Excessive yawning isn't always fatigue. It could indicate neurological problems like stroke or epilepsy, or autonomic nervous system imbalance. Brain temperature regulation issues can also trigger it. Seek medical advice if accompanied by dizziness or confusion.
Web Summary : लगातार जम्हाई आना हमेशा थकान नहीं होती। यह स्ट्रोक या मिर्गी जैसी तंत्रिका संबंधी समस्याओं, या स्वायत्त तंत्रिका तंत्र के असंतुलन का संकेत हो सकता है। मस्तिष्क के तापमान को नियंत्रित करने में समस्या भी इसे ट्रिगर कर सकती है। चक्कर आने या भ्रम होने पर चिकित्सीय सलाह लें।