Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World Thyroid Day 2025 : थायरॉईड आहे, मग आहारात हवीच ‘ही’ ५ धान्य! वजनवाढ छळणार नाही...

World Thyroid Day 2025 : थायरॉईड आहे, मग आहारात हवीच ‘ही’ ५ धान्य! वजनवाढ छळणार नाही...

World Thyroid Day 2025 : Best Whole Grains For Thyroid Patients : Thyroid Friendly Foods : Boosting Thyroid Health and Wellness : 5 Best Foods for Thyroid Health : थायरॉईड नियंत्रणासाठी ५ हेल्दी धान्यांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 10:05 IST2025-05-25T10:00:00+5:302025-05-25T10:05:02+5:30

World Thyroid Day 2025 : Best Whole Grains For Thyroid Patients : Thyroid Friendly Foods : Boosting Thyroid Health and Wellness : 5 Best Foods for Thyroid Health : थायरॉईड नियंत्रणासाठी ५ हेल्दी धान्यांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.

World Thyroid Day 2025 Best Whole Grains For Thyroid Patients Boosting Thyroid Health and Wellness 5 Best Foods for Thyroid Health | World Thyroid Day 2025 : थायरॉईड आहे, मग आहारात हवीच ‘ही’ ५ धान्य! वजनवाढ छळणार नाही...

World Thyroid Day 2025 : थायरॉईड आहे, मग आहारात हवीच ‘ही’ ५ धान्य! वजनवाढ छळणार नाही...

२५ मे हा दिवस जागतिक थायरॉईड दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या बदलत्या लाईफस्टाईलनुसार, थायरॉईड ग्रंथीशी संबंधित अनेक समस्या दिवसेंदिवस  वाढत चालल्या आहेत. थायरॉईड (World Thyroid Day 2025) ही शरीरातील महत्त्वाची ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित करते. थायरॉईड (Best Whole Grains For Thyroid Patients) संबंधी जेव्हा आजार होतात तेव्हा थायरॉईड ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या थायरॉईडचं प्रमाण (Thyroid Friendly Foods) कमी जास्त होऊन संपूर्ण शरीराचं संतुलन त्यामुळे बिघडू शकतं. घरात इतर कुणाला जर थायरॉईड संबंधी आजार असेल तर तो नंतरच्या पिढीतही होऊ शकतो. परंतु थायरॉईडला घाबरण्याचे कारण नाही, योग्य औषधोपचारासोबतच संतुलित आहार घेतल्याने थायरॉईडचे प्रमाण कमी करता येऊ शकते(5 Best Foods for Thyroid Health).

काही धान्ये (whole grains) अशी आहेत, जी थायरॉईड रुग्णांसाठी विशेष फायदेशीर मानली जातात. या धान्यांचा आहारात समावेश केल्याने केवळ पोषणच मिळत नाही तर, पचन सुधारते, ऊर्जा वाढवते आणि थायरॉईड हार्मोन्सचं संतुलन राखण्यास मदत होते. जर ही काही निवडक धान्य योग्यरित्या शिजवली आणि संतुलित प्रमाणात खाल्ली तर ती धान्ये थायरॉईडसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी आपल्या आहारात समाविष्ट करावीत अशा ५ सर्वोत्तम धान्यांबद्दल जाणून घेऊयात. लखनऊच्या विकास नगर येथील न्यूट्रीवाइज क्लिनिकच्या पोषणतज्ज्ञ नेहा सिन्हा  यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत, थायरॉईड असणाऱ्यांनी आपल्या आहारात कोणत्या प्रकारची धान्य समाविष्ट करावीत याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

थायरॉईड असणाऱ्यांनी आहारात कोणत्या प्रकारची धान्य समाविष्ट करावीत ? 

१. क्विनोआ (Quinoa) :- बारीक राजगिऱ्याप्रमाणेच दिसणारं हे धान्य प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. यामध्ये सर्व ९ अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात. याचबरोबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि आयर्न हे पोषक घटकही मुबलक प्रमाणात असतात, जे थायरॉईडच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर ठरतात. क्विनोआचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि थायरॉईड ग्रंथीचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

पोषणतज्ज्ञ सांगतात, कायम लक्षात ठेवा ३ नियम, बद्धकोष्ठतेच्या समस्येतून होईल सुटका - सकाळी वाटेल फ्रेश!

२. ब्राऊन राइस (Brown Rice) :- ब्राऊन राइस हा पोषणमूल्यांनीयुक्त असा आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या तांदळापेक्षा कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे  प्रमाण हळूहळू वाढते, आणि हे थायरॉईड रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरतं. ब्राऊन राइस खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि ऊर्जाही टिकवून ठेवण्यास मदत होते. 

३. ओट्स (Oats) :- ओट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. ओट्स खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटल्याने  आपण कमी खातो परिणामी वेटलॉस देखील होतो. यामध्ये असणारा बीटा-ग्लूकन नावाचा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, त्यामुळे शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहते. थायरॉईड रुग्णांसाठी ओट्स हा एक पोषणमूल्यांनी समृद्ध आणि पचायला हलका असा उत्तम पर्याय आहे.

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

४. जवं - बार्ली (Barley) :- जवामध्ये पॉलीफेनॉल्स आणि व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतात. हे धान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील सूज (दाह) कमी करण्यास उपयुक्त ठरते. थायरॉईड रुग्णांसाठी जव एक आरोग्यदायी आणि पचायला हलकं असं संपूर्ण धान्य आहे. 

५. राजगिरा (Royal Grain) :- राजगिऱ्यात प्रथिनं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. राजगिरा ग्लूटेन - फ्री असल्यामुळे सहजपणे पचतात. थायरॉईड असणाऱ्यांनी राजगिऱ्याच्या समावेश आहारात करणे फायदेशीर ठरते.

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

या ५ धान्यांबरोबरच हिरव्या पालेभाज्या, डाळी, दही, बदाम - शेंगदाणे आणि प्रथिनयुक्त अन्नपदार्थही आपल्या आहारात समाविष्ट करा.
थायरॉईड असणाऱ्यांना ही ५ धान्ये विशेष फायदेशीर आहेत. ही धान्ये योग्य पद्धतीने भिजवून आपल्या आहारात समाविष्ट केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Web Title: World Thyroid Day 2025 Best Whole Grains For Thyroid Patients Boosting Thyroid Health and Wellness 5 Best Foods for Thyroid Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.