Join us
Daily Top 2 Weekly Top 5

World Sleep Day 2026 : दुपारी झोप येते, लगेच घ्या १० मिनिटांची पॉवर नॅप...पाहा योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:31 IST

World Sleep Day 2026: आज 13 मार्च रोजी जगभरात World Sleep Day 2026 म्हणजे जागतिक झोप दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना चांगल्या आणि पुरेश्या झोपेचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे.

World Sleep Day 2026: चांगली आणि पुरेशी झोप ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत कामाचा ताण, उशिरा झोपणे, सकाळी लवकर उठणे अशा कारणांमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. आज 13 मार्च रोजी जगभरात World Sleep Day 2026 म्हणजे जागतिक झोप दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना चांगल्या आणि पुरेश्या झोपेचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे. अशात आज आपण दुपारी झोप का येते आणि त्यावर काय उपाय करावा, याबाबत पाहणार आहोत.

दरवर्षी हा दिवस एका विशेष थीमसह साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे “चांगली झोप घ्या, चांगले जीवन जगा.” ही थीम आपल्याला सांगते की चांगली झोप घेतल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य अधिक चांगले राहते.

दुपारी झोप का येते?

बऱ्याच लोकांची तक्रार असते की, दुपारचे जेवण केल्यानंतर त्यांना झोप येते, खासकरून उन्हाळ्यात ही समस्या जास्त जाणवते. खरं तर दुपारी झोप येणे ही शरीरातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. यामागे आपल्या शरीराची Circadian Rhythm म्हणजेच जैविक घड्याळ जबाबदार असते. या प्रक्रियेमुळे साधारणपणे दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान शरीराची ऊर्जा थोडी कमी होते, त्यामुळे झोप येऊ लागते. अशात यावेळी पॉवर नॅप घेतल्यास मदत मिळू शकते. 

पॉवर नॅप म्हणजे काय?

पॉवर नॅप ही अशी छोटी झोप असते जी थकवा दूर करून ताजेतवाने वाटण्यासाठी घेतली जाते. ही झोप जास्त वेळ घेण्याची गरज नसते. फक्त 10 ते 20 मिनिटांची झोप घेतली तरी शरीर पुन्हा सक्रिय होते. पण पॉवर नॅप 30 मिनिटांपेक्षा जास्त घेऊ नये.

पावर नॅप घेण्याचा योग्य मार्ग

जर ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला झोप येत असेल, तर पावर नॅप घेणे फायदेशीर ठरू शकते. दुपारच्या वेळी छोटा नॅप घेणे सर्वात योग्य मानले जाते. संध्याकाळनंतर पावर नॅप घेणे टाळावे, कारण त्यामुळे रात्रीची झोप बिघडू शकते. खुर्चीवर बसून किंवा टेबलवर डोके टेकवूनही थोडी झोप घेता येते. मात्र झोपताना मानेला योग्य आधार मिळेल याची काळजी घ्या.

पावर नॅपचे फायदे

1. ऊर्जा वाढते

पावर नॅप घेतल्याने मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होतो आणि शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते.

2. ताण कमी होतो

थोडी झोप घेतल्याने शरीरातील ताण वाढवणारा कोर्टिसोल हार्मोन कमी होण्यास मदत होते.

3. चिडचिड कमी होते

झोपेच्या कमतरतेमुळे मूड खराब होऊ शकतो. पण छोट्या पावर नॅपमुळे मूड सुधारतो आणि चिडचिड कमी होते.

English
हिंदी सारांश
Web Title : World Sleep Day 2026: Take a 10-minute power nap for energy.

Web Summary : World Sleep Day 2026 emphasizes sleep's importance for health. Afternoon naps, driven by the body's natural rhythms, can combat fatigue. A 10-20 minute power nap boosts energy, reduces stress, and improves mood. Avoid evening naps to maintain nighttime sleep quality.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य