World Lung Day 2025 : फुप्फुसं ही शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. पण जसं जसं आपलं वय वाढतं, फुप्फुसं कमजोर (Lungs Damage Sings) होऊ लागतात, ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. प्रदूषण तर फुप्फुसं खराब होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. आज World Lung Day (World Lung Day 2025) आहे. या दिवशी फुप्फुसांबाबत लोकांना जागरूक केलं जातं. अशात आपण आज फुप्फुसं डॅमेज होत असल्याची काही लक्षणं पाहणार आहोत.
वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2022 नुसार, भारतात वायू प्रदूषण फार जास्त आहे. त्यामुळे दुषित हवेत श्वास घेतल्याने फुप्फुसांचं नुकसान होतं. अशात शरीर काही संकेत देतं. हे संकेत वेळीच ओळखणं गरजेचं असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कमजोर फुप्फुसांचे संकेत
श्वास घेण्यास अडचण
जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हा संकेत फुप्फुसाची क्षमता कमी झाल्याचा आहे. ही समस्या सामान्यपणे पायऱ्या चढताना किंवा एक्सरसाईज करताना होते. तसेच ही समस्या वयासोबतच फुप्फुसांची इलास्टिसीटी कमी झाल्यामुळे किंवा फुप्फुसांना प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानांमुळेही होतं.
सतत खोकला
कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला सतत खोकला येत असेल तर हा फुप्फुसांच्या समस्येचा संकेत असू शकतो. हा फुप्फुसामध्ये जळजळ किंवा सूज असण्याचा संकेत असू शकतो. सोबतच कफ येणंही फुप्फुसाची समस्या असण्याचं संकेत असू शकतो. जर ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त राहत असेल तर वेळीच सावध व्हा.
अस्वस्थता
जर तुम्हाला श्वास घेतेवेळी घाबरल्यासारखं वाटत असेल तर फुप्फुसामध्ये सूज किंवा कॉन्स्ट्रिक्शनचा संकेत असू शकतो. त्यामुळे अशी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
छातीमध्ये वेदना
खोकताना छातीत सतत वेदना होत असेल तर हा फुप्फुसाची समस्या असण्याचं संकेत असू शकतो. हा फुप्फुसामध्ये सूज किंवा इन्फेक्शनचा संकेत असू शकतो.
सतत थकवा
जर तुम्हाला फार काही जास्त मेहनत न करता थकवा जाणवत असेल तर हा फुप्फुसाची समस्या असण्याचा संकेत असू शकतो. फुप्फुसं जेव्हा योग्यपणे काम करत नाहीत, तेव्हा शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही. ज्यामुळे थकवा जाणवतो.