शरीराच्या सगळ्या क्रिया योग्य पद्धतीने चालण्यामध्ये लिव्हरचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. खराब झालेल्या पेशी बदलण्याचे काम लिव्हर आपले आपण करते. त्यामुळे शरीर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या क्रिया पार पाडू शकते. शरीराचे सगळेच कार्य दिर्घकाळ सुरळीत सुरू ठेवायचे असेल तर शरीराचे सर्व अवयव (World Liver Day 2025) योग्य पद्धतीने काम करणे आवश्यक असते. आपण चुकीच्या (Best And Worst Foods For Your Liver) सवयींमुळे शरीराच्या अवयवांवर घातक परिणाम करतो आणि त्यामुळे आपल्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. लिव्हरच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक लिव्हर डे (World Liver Day) साजरा केला जातो, त्यानिमित्ताने...(World Liver Day 2025 Theme Best & Worst Foods For Your Liver).
या दिवसाचे खास उद्दिष्ट हेच आहे की, लिव्हरच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करणे. तसेच लिव्हरच्या आजारांना प्रतिबंधित करता येऊ शकतील अशा निरोगी सवयी स्वतःला लावून घेण्यास लोकांना प्रोत्साहित केले जाते. जागतिक स्तरावर लिव्हरसंबंधित आजार वाढत असताना, आपल्या लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय खावे किंवा खाऊ नये याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
World Liver Day थीम...
२०२५ च्या लिव्हर दिनाची थीम 'अन्न हेच औषध' आहे. या वर्षीची थीम संतुलित पोषणाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. तसेच, पौष्टिक अन्न सर्वांना उपलब्ध आणि परवडणाऱ्या योग्य दारांत करण्यासाठी महत्वाची धोरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करते.
आहाराचा लिव्हरच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो...
निरोगी, संतुलित आहार लिव्हरसंबंधित सगळी कार्ये अगदी उत्तम पद्धतीने चालण्यास मदत करते, तसेच लिव्हरच्या आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत करतो. फळे, भाज्या, कडधान्य आणि प्रथिनेयुक्त आहार लिव्हरचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकतो.
फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...
लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात काय खावे ?
आहारात कॉफी, ब्लूबेरी, द्राक्षे, बीटरूट रस, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, काजू, मासे, ऑलिव्ह ऑइल, ग्रीन टी, पालक या पदार्थांचा समावेश केल्याने लिव्हरचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
काय खाणे टाळावे ?
दारु, चरबीयुक्त पदार्थ, साखर, पॅकेजिंग केलेले स्नॅक्स, अधिक प्रमाणांत मीठ खाणे टाळावे. यामुळे लिव्हरचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
रताळं खा पोटभर, वजन कमी होईल झरझर! रिसर्चनुसार फक्त उपवासालाच नाही, वेटलॉससाठी आहे बेस्ट...
लिव्हरच्या चांगल्या आरोग्यासाठी....
१. हायड्रेटेड राहा :- लिव्हरसंबंधित सगळी कार्ये सुरळीत चालण्यासाठी भरपूर पाणी प्या.
२. नियमित व्यायाम करा :- शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहिल्याने निरोगी वजन राखण्यास मदत होते परिणामी, फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.
३. अनावश्यक औषधे टाळा :- औषधे जास्त प्रमाणांत घेतल्यास लिव्हरचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
४. लसीकरण करा :- हिपॅटायटीस 'ए' आणि 'बी' साठी लसीकरण तुमच्या लिव्हरचे विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
५. नियमित तपासणी :- लिव्हरचे आजार बऱ्याचदा शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत ओळखता येत नाहीत. नियमित वैद्यकीय तपासणीमुळे आजार लवकर ओळखण्यास आणि वेळेवर उपचार करण्यास मदत होऊ शकते.