'किडनी' हा आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. 'किडनी' शरीरातील घाणेरडे पदार्थ वेगळे करण्याचे आणि त्यांना लघवीच्या स्वरूपात बाहेर काढण्याचे मुख्य काम किडनी (World Kidney Day 2025) करते. अशा परिस्थितीत, जर आपण लघवी बराच काळ रोखून ठेवली तर किडनीच्या आजारासोबतच अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. बरेचजण (Holding Pee Can Cause Kidney Damage Expert Warn More Disease Would Occur) आपल्या घराव्यतिरिक्त इतर ठिकाणी बाहेर (Side Effects of Holding pee) शौचालयास जाणे टाळतात. सार्वजनिक ठिकाणी शौचालयास जाणे बरेचजणांना आवडत नाही(Holding Your Pee Is It Safe Is It Safe To Hold Your Pee Five Possible Complications).
इतकेच नाही तर घर - ऑफिसमध्ये असताना कामाच्या घाई गडबडीत आपण कित्येकदा लघवी रोखून धरतो. अशा प्रकारे लघवी आपण रोखून धरतो आणि जेव्हा अगदी असह्य होत तेव्हा आपण लघवीला जातो. असे करणे काहीवेळा ठीक आहे पण एकदा जर का ही सवय लागली तर वारंवार आपण असेच करतो. परंतु आपल्या या सवयीमुळे आपल्याला तेव्हा काहीच वाटत नाही परंतु कालांतराने भविष्यात आपल्याला या छोट्याशा चुकीच्या सवयीमुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. आज वर्ल्ड किडनी डे च्या निमित्ताने, गुरुग्राम येथील मारिंगो एशिया हॉस्पिटलमधील युरोलॉजीचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. अमन गुप्ता यांनी लघवी रोखून धरण्याच्या या सवयीचे परिणाम आणि आजार याविषयी अधिक माहिती दिली आहे.
लघवी थांबवून ठेवल्याने शरीरावर होणारे परिणाम :-
एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या मूत्राशयात ३०० ते ५०० मिली लघवी साठू शकते. याचबरोबर, आपल्याला दर ३ ते ४ तासांनी लघवी करण्याची तीव्र इच्छा होते. अशा परिस्थितीत, जर लघवी बराच काळ थांबवून ठेवल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), कंबरदुखी, मूत्रपिंडाचा संसर्ग, पायलोनेफ्रायटिस सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
वेटलॉससाठी तुम्हीसुद्धा 'हे' ६ शॉर्टकट वापरत असाल तर थांबा! वजन कणभर कमी होणार नाही, कारण...
किती वेळ तुम्ही लघवी रोखून ठेवणे योग्य आहे :-
डॉक्टरांच्या मते, १० तास किंवा १० तासांपेक्षा जास्त काळासाठी जर तुम्ही लघवी रोखून ठेवत असाल तर तुम्हाला भविष्यात अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दीर्घकाळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशय ताणले जाऊ शकते त्यामुळे त्यामध्ये जसजशी लघवी भरत जाते तसतसे ते विस्तार पावते. मूत्राशय ताणले गेल्यामुळे आकुंचन निर्माण करणारे स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि लघवी पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही.
उपाशीपोटी मॉर्निंग वॉकला जाणं म्हणजे आजारपण घरी घेऊन येणं! चुकूनही करु नका 'या' ५ गोष्टी...
लघवी रोखून ठेवल्याने किडनीचे नुकसान कसे होऊ शकते ?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कधीकधी जास्त प्रमाणात लघवी साचल्याने 'वेसिकोयूरिटेरल रिफ्लक्स' नावाची स्थिती उद्भवू शकते, ज्यामध्ये लघवी मूत्राशयातून मूत्रपिंडात परत येते. या उलट प्रवाहामुळे मूत्रपिंडाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो आणि कालांतराने मूत्रपिंडाचे नुकसान किंवा दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार (CKD) होऊ शकतो.
अंगणातील लालचुटुक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांना मिळेल पोषण - येईल नॅचरल चमक...
लघवी रोखून ठेवण्याचे दुष्परिणाम :-
१. बरेच तास लघवी थांबवून ठेवणे जर रोजच्या रोज होत असेल तर मूत्राशयात लघवी साठून राहत असल्याने तिथे बॅक्टरीयाची वाढ होऊ लागते, मूत्रमार्गामध्ये संसर्ग होऊ लागतो.
२. लघवी रोखून धरण्याची सवय लागली तर काही काळानंतर मुत्राशयातील स्नायू कमजोर होतात, लघवीचा ओव्हरफ्लो होण्यावर संयम ठेवणे कठीण होऊन बसते. लघवी धरून ठेवण्याची मुत्राशयाची एक क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा जास्त लघवी धरून ठेवावी लागल्यास लघवी बाहेर येते.
३. ८ ते १० तासांपर्यंत लघवी थांबवून ठेवलेली असेल तर त्यानंतर लघवी रोखून धरणे पूर्णपणे अशक्य होऊन बसते आणि अतिशय तातडीनं लघवी करावी लागू शकते.
४. लघवी रोखून ठेवणे वारंवार आणि खूप काळ केले जात असेल तर लघवी बाहेर पडणे रोखणारा सेफ्टी व्हॉल्व निकामी होतो, यामुळे लघवीचा बॅकफ्लो होतो व किडनीची कार्यक्षमता खालावते.