Join us

कतरिना कैफ-दीपिका पादुकोणच्या डाएटिशियनने सांगितले ३ सोपे उपाय, ब्लडप्रेशर कायम राहिल नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 19:44 IST

3 Simple Tricks To Control Blood Pressure: ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब वाढू द्यायचा नसेल तर काही गोष्टी नियमितपणे करायला हव्या (World Hypertension Day 2025); असा सल्ला कतरिना कैफ, दीपिका पादुकोणच्या आहारतज्ज्ञांनी दिला आहे.(what to do if blood pressure is too high?)

ठळक मुद्दे श्वेता शाह यांनी याविषयीचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हल्ली बदललेल्या लाईफस्टाईलमुळे कमी वयातच अनेक आजार डोकं वर काढायला लागले आहेत. त्यापैकीच एक आहे रक्तदाब (World Hypertension Day  2025). बीपी किंवा ब्लडप्रेशरचा त्रास तरुणांमध्ये दिसण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यासाठी अनेक वेगवेगळी कारणं आहेत. बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या- औषधी घ्यायलाच हवीत (how to control high blood pressure?). पण त्यासोबतच तुम्ही काही नैसर्गिक उपायही करून पाहू शकता (3 simple tricks to control blood pressure). हे उपाय कतरिना कैफ, दीपिका पादुकोणसारख्या सेलिब्रिटींना आहारविषयक मार्गदर्शन करणाऱ्या सेलिब्रिटी डाएटिशियन श्वेता शाह यांनी सांगितले आहेत.(what to do if blood pressure is too high?)

रक्तदाब नेहमीच नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे?

 

१. अनुलोम विलोम

श्वेता शाह यांनी याविषयीचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अनुलोम- विलोम प्राणायाम हा एक सगळ्यात उत्तम उपाय आहे.

गडबडीत भाजीमध्ये खूपच तेल घातलं? तवंग काढून भाजीतलं तेल कमी करण्यासाठी २ खास उपाय

दिवसातून ३ वेळा अनुलोम विलोम प्राणायाम करायला हवे. एकावेळी साधारण १० वेळा श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया व्हायला हवी. काही दिवसांतच रक्तदाब नियंत्रित होण्यामध्ये खूप चांगला फरक दिसून येईल. 

 

२. काढा

रक्तदाब नेहमीच नियंत्रित ठेवणारा दुसरा उपाय म्हणजे मेथ्या, दालचिनी आणि बडिशेप हे तीन पदार्थ एकत्र करून त्यांचा काढा करून पिणे. दिवसातून एकदा हा काढा प्यावा.

काकडीची कोशिंबीर नेहमीच खाता, आता पहाडी रायता करून पाहा- घ्या कुणाल कपूर स्पेशल रेसिपी

दिवसाच्या सुरुवातीला घेतला तर खूपच उत्तम. काही दिवस नियमितणपणे हा उपाय केल्यास लगेचच फरक दिसून येईल. 

 

३. ज्यूस

आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सांगितलेला तिसरा उपाय म्हणजे सेलेरी आणि पार्सली यांचा ज्यूस करणे आणि तो नियमितपणे पिणे.

वटपौर्णिमेची पूजा करताना दिसाल सगळ्यात सुंदर! करा टोमॅटोचा 'हा' जादुई उपाय- त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

पण सेलेरी आणि पार्सली मिळणे कठीण असेल तर वरील दोन उपाय नियमितपणे करा. तुमचे बीपी नेहमीच नियंत्रित राहील. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स