Join us

World Hepatitis Day 2025: ‘या’ घातक सवयींमुळे वाढतंय हिपॅटायटीसचं प्रमाण, पाहा धोके आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:55 IST

World Hepatitis Day 2025: हेपेटायटीस आजार होण्याची कारणं वेगवेगळी आहेत. अनेकदा जर हा आजार झाल्यावर याची काहीच लक्षणं दिसत नाही. आणि पुढे जाऊन गंभीर रूप घेतो.

World Hepatitis Day 2025: आज वर्ल्ड हिपॅटायटीस डे आहे. दरवर्षी लोकांना या गंभीर आजाराबाबत जागरूक करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हिपॅटायटीस हा शब्द अनेकांनी ऐकला असेल, पण अनेकांना या आजाराबाबत पुरेशी माहिती नसते. हिपॅटायटीस (Hepatitis) हा लिव्हरसंबंधी एक गंभीर आजार आहे. जर वेळीच हा आजार रोखला गेला नाही तर लिव्हर फेल होऊ शकतं किंवा कॅन्सरही होऊ शकतो. महत्वाची बाब म्हणजे हा आजार लाइफस्टाईलसंबंधी आपल्याच काही चुकांमुळे होतो. अलिकडे महिला आणि पुरूष दोघांमध्येही हा आजार खूप वाढत चालल्याचं अनेक एक्सपर्ट सांगतात.

हिपॅटायटीस आजार होण्याची कारणं वेगवेगळी आहेत. अनेकदा जर हा आजार झाल्यावर याची काहीच लक्षणं दिसत नाही. आणि पुढे जाऊन गंभीर रूप घेतो. वेळीच याची लक्षणं दिसत नसल्याचं वेळेवर उपचारही घेता येत नाही.

आज वर्ल्ड हिपॅटायटीस डे निमित्तानं या आजाराची कारणं, लक्षणं याबाबत आपण समजून घेणार आहोत. या आजारानं लिव्हर कसं प्रभावित होतं हेही पाहणार आहोत. जेणेकरून वेळीच आपल्याला उपचार घेता येतील.

जास्त दारू पिणं

जे लोक रोज खूप दारू पितात त्यांच्या लिव्हरवर याचा खूप जास्त वाईट प्रभाव पडतो. दारूमुळे लिव्हरची हिपॅटायटीससोबत लढण्याची क्षमता कमी होते. अशात हिपॅटायटीसचं इन्फेक्शन वाढतं.

ओव्हरईट‍िंग

जेव्हा आपणं ओव्हरईटिंग करतो म्हणजेच भूकेपेक्षा जास्त प्रमाणात खातो तेव्हा आपलं वजन वाढतं. तसेच जास्त अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानेही वजन वाढतं, पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढू लागते. ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे देखील हिपॅटायटीस आजार होण्याचा धोका अधिक असतो.

स्‍मोक‍िंग

नेहमीच जे लोक स्मोकिंग करतात त्यांना फॅटी लिव्हर आजार होण्याचा धोका अधिक असतो. या स्थितीत लिव्हरवर सूज वाढते. अनेकदा तर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरसारखी गंभीर स्थितीही निर्माण होऊ शकते.

दूष‍ित पाणी

केवळ दारू किंवा स्मोकिंग केल्यानंच हिपॅटायटीस आजार होतो असं नाही. तर दूषित पाण्यातही याचे व्हायरस असतात. अशात तर आपण दूषित पाणी प्यायलो तर या आजाराचा धोका अधिक वाढतो.

असुरक्षित लैंगिक संबंध

हिपॅटायटीस होण्याचं हेही एक मुख्य कारण आहे. जर आपण एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत विना सुरक्षा शारीरिक संबंध ठेवत असू हिपॅटायटीसच्या व्हायरसचं इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. 

काय असतात याची लक्षणं?

सतत थकवा

कमजोरी जाणवणे

सतत पोट दुखणे

मळमळ आणि उलटी

अचानक ताप येणे

त्वचेवर खास येणे

लघवीचा रंग बदलणे

त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा

हिपॅटायटीस हा एक गंभीर आजार आहे. याचे वेगवेगळे प्रकारही असतात. अशात जर आधीच याची लक्षणं आणि कारणं आपल्याला माहीत असतील तर वेळीच उपचार करता येतील. वरील कोणतीही लक्षणं दिसली तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा. तसेच हेल्दी लाइफस्टाईल जगा, स्वच्छता ठेवा आणि नशेच्या पदार्थांपासून दूर रहा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स