Women's Day 2026: घर, ऑफिस आणि लेकरांच्या जबाबदाऱ्या सांभाळात होणाऱ्या धावपळीमुळे महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या वयात करिअर, कुटुंब आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश फक्त महिलांच्या यशाचा गौरव करणे नाही, तर त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणेही आहे. त्यामुळे ३० वर्षांनंतर महिलांनी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
३० नंतर शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे आणि नैसर्गिक चमक कमी होणे अशा समस्या दिसू शकतात. त्यामुळे कोलेजन वाढवण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.
३० वर्षांनंतर महिलांनी काय खावे?
१) प्रोटीनयुक्त पदार्थ
कोलेजन हा एक प्रकारचा प्रोटीन आहे. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे गरजेचे असते.
काय खावे?
पनीर, दही, मूगडाळ, राजमा, चणे, सोयाबीन, टोफू, तसेच ड्रायफ्रूट्स आणि नट्स यांचा आहारात समावेश करू शकता.
२) बायोटिन आणि झिंक
बायोटिन आणि झिंक शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यांची कमतरता असल्यास त्वचेवर डाग, केस गळणे आणि नखं कमकुवत होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
काय खावे?
बदाम, भोपळ्याच्या बिया, तीळ, मशरूम आणि अंड्याचा पांढरा भाग खाणे फायदेशीर ठरते.
३) ओमेगा-3 फॅटी अॅसिड
ओमेगा-३ फॅटी अॅसिड शरीरासाठी खूप आवश्यक आहे. याची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होऊ शकतात आणि सांध्यांमध्ये वेदना वाढू शकतात.
काय खावे?
अळशीचे बी, चिया सीड्स, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया आहारात घ्याव्यात.
४) व्हिटामिन C असलेले पदार्थ
व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि कोलेजन तयार होण्यास मदत करते. याची कमतरता असल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.
काय खावे?
आवळा, संत्रे, लिंबू, कीवी, स्ट्रॉबेरी आणि ढोबळी मिरची यांचा आहारात समावेश करा.
Web Summary : After 30, women need protein, biotin, zinc, Omega-3, and Vitamin C. Include paneer, nuts, seeds, and citrus fruits for health and youthful skin. Prioritize self-care through proper diet.
Web Summary : 30 के बाद, महिलाओं को प्रोटीन, बायोटिन, जस्ता, ओमेगा -3 और विटामिन सी की आवश्यकता होती है। स्वास्थ्य और युवा त्वचा के लिए पनीर, नट्स, बीज और खट्टे फल शामिल करें। उचित आहार के माध्यम से आत्म-देखभाल को प्राथमिकता दें।