Brain Tumour : आयुष्य हे किती किचकट आणि चढउतार असलेलं व वेगवेगळी खडतर वळणांनी भरलेलं असतं. अनेकदा जीवन जगत असताना एकापाठी एक अनेक अडचणी समोर येऊन उभ्या राहतात. ज्यांचा आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या अडचणी सोडवण्यात आपण इतके गुंतलो जातो की, आपल्याला तब्येतीकडे लक्षही देता येत नाही किंवा काही काही अंदाजही लावता येत नाही. असंच काहीसं एका वर्षीय महिलेसोबत झालं.
सॅम अॅडम्स नावाच्या या महिलेनं आधी आपल्या वडिलांना गमावलं, नंतर पाळिव प्राण्याला गमावलं आणि नंतर वेदनादायी घटस्फोटाचा सामना करावा लागला. लागोपाठ बसलेल्या या धक्क्यांमुळे आणि वेदनांमुळे त्या सतत चिंतेत राहत होत्या, सतत त्यांचं डोकं दुखत होतं. या गोष्टी भावनात्मक समजून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण त्यांना कल्पनाही नव्हती की, त्यांना एक गंभीर आजार झालाय.
सॅम यांनी 'द सन'सोबत बोलताना सांगितलं की, "मला वाटलं की, हा त्रास मला माझ्या जीवनातील तणाव आणि नकारात्मकतेमुळे होत असेल". पण सॅमच्या अॅपल वॉचचं वेगळं म्हणणं होतं. या डिवाइसनं महिलेला हार्ट रेटमध्ये वाढ झाल्याचे सतत संकेत दिले, ज्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.
पुढे एक दिवस एका खांबावर डोकं आदळल्यानं सॅम यांचं डोक्याचं दुखणं आणखी बिघडलं आणि त्यांना सतत थकवा जाणवू लागला". त्यांनी सांगितलं की, काळजीपोटी ब्लड प्रेशर चेक केलं. त्यानंतर डॉक्टरांनी ईसीजी काढला. टेस्टमधून समोर आलं की, हृदयाचे ठोके अॅक्टोपिक होते किंवा कार्डियक अॅक्टोपी होते.
कार्डियक अॅक्टॉपी काय आहे?
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, कार्डियक अॅक्टोपी एक अशी स्थिती आहे जी हृदयाच्या विद्युत प्रणालीमध्ये गडबड झाल्यावर निर्माण होते, ज्यामुळे हृदय वेळेआधीच आकुंचन पावतं किंवा हृदयाचे ठोके बंद पडतात. हे अनेकदा हृदयरोगाचे संकेत असतात. या समस्या होण्याला तणाव, चिंता, झोपेची कमतरता, मद्यसेवन आणि कॅफीन या गोष्टी कारणीभूत असतात. सॅम यांना हार्ट रेट कमी करण्यासाठी बीटा ब्लॉकर्स दिले गेले आणि 24 तास एक हार्ट मॉनिटर लावण्यात आलं.
धक्कादायक बाब म्हणजे हे इथेच थांबलं नाही. नंतर त्यांच्या आणखी काही टेस्ट करण्यात आल्या तेव्हा डॉक्टरांना सॅम याना ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं. सॅम यांनी सांगितलं की, "माझं डोकं गरगरत होतं. मला सतत चक्कर येत होते". ट्यूमर लहान होता, त्यामुळे सर्जरी शक्य नव्हती. आता सॅम रोज अॅस्पिरिन घेत होत्या आणि दर महिन्याला ब्रेन स्कॅन केला जात होता.
सुरूवातीचे संकेत महत्वाचे
सॅम सांगतात की, "तणाव, चिंतेमुळे होत असलेल्या डोकेदुखीकडे मी दुर्लक्ष केलं". सुदैवानं आता त्यांच्या हृदयरोगावर योग्यपणे उपचार करण्यात आले. पण त्यांच्या मेंदूच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्या म्हणाल्या की, "मी आता ट्यूमरसोबत जगत आहे आणि ठीक आहे. मी खरंच टेक्नॉलॉजीची आभारी आहे, ज्यामुळे मला असे काही संकेत मिळाले, ज्यांची मला माहिती नव्हती".