Winter Care Tips : थंडीचा तडाखा वाढला की, अनेक लोक स्वेटर, मोजे आणि उबदार कपडे घालून पूर्ण शरीर झाकून झोपतात. वरून ब्लॅंकेटही पांघरतात. थंडीमध्ये असं झोपणं आरामदायक असतं, पण स्वेटर घालून झोपणं योग्य आहे का? मोजे घालून झोपावे का नाही? स्वेटर घालून झोपणं योग्य आहे की नाही? हे आज आपण पाहणार आहोत.
स्वेटर घालून झोपणे योग्य आहे का?
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, स्वेटर सहसा जाड आणि उबदार असतात, त्यामुळे थंडीमध्ये झोपताना उब मिळते. पण स्वेटर खूप उष्ण हवामानात घातल्यास घाम येऊ शकतो. स्वेटर जर जुनं, धूळयुक्त किंवा घाणेरडं असेल तर त्यामुळे त्वचेवर खाज, रॅशेस, इरिटेशन होऊ शकतं.
लक्षात ठेवण्यासारखे
स्वेटर नेहमी स्वच्छ आणि कोरडं असावं. खूप टाईट स्वेटर शरीरावर दाब देतं आणि झोपेत अडथळा आणतं. त्यामुळे लूज आणि आरामदायक स्वेटरच वापरावा.
रात्री झोपताना कोणते कपडे घालावेत?
योग्य कपडे निवडल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. कॉटन, लिनेन किंवा हलक्या फॅब्रिकचे कपडे त्वचेला श्वास घेऊ देतात. घाम शोषतात, लूज फिट कपड्यांमुळे झोपेत अडथळा येत नाही.
सॉक्स घालून झोपण्याचे नुकसान
1) झोप न येण्याची समस्या
जर तुम्ही सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. अशात तुमची झोप पूर्ण होणार नाही आणि अधे-मधे तुम्हाला जाग येईल.
2) नसांवर पडतो दबाव
जेव्हा तुम्ही सॉक्स घालून झोपता तेव्हा नसांवर दबाव पडतो. नसांवर दबाव पडल्याने तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो.
3) ब्लड सर्कुलेशन
सॉक्स घालून झोपल्याने नसांवर प्रेशर पडतं. ज्यामुळे तुमचं ब्लड सर्कुलेशन बिघडतं. यामुळे इतरीही वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
4) ओवर हीटिंगची समस्या
हिवाळ्यात सामान्यपणे लोक ब्लॅंकेट किंवा दुलई घेऊन झोपतात. अशात जर तुम्ही सॉक्स घालत असाल तर तुमचं शरीर जास्त गरम होऊ सकतं. ज्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.
5) इन्फेक्शनचा धोका
जास्त वेळ सॉक्स घालून राहिल्याने तुमच्या पायात इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो. अशात तुम्हाला खाज येण्याची समस्या होऊ शकते.
6) श्वास घेण्यास समस्या
रात्री टाइट सॉक्स घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दबाव पडतो. ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यास जास्त जोर लावावा लागतो. अशात श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.
