Blanket And Cancer Connection: गारठवणाऱ्या थंडीत ब्लॅंकेट किंवा दुलई घेऊन झोपण्यासारखं दुसरं सुख नाही. बरेच लोक थंडीमुळे ब्लॅंकेट, दुलईच्या बाहेरही पडत नाही. पण अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ब्लॅंकेटने कॅन्सर होतो असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खरंच असं काही होतं की ही केवळ अफवा आहे? असा प्रश्न लोकांच्या मनात येतोय. लोक घाबरलेही आहेत. सिंथेटिक ब्लॅंकेट आणि दुलईमुळे कॅन्सर होतो, असं या व्हिडिओत म्हटलं आहे. हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर जयेश शर्मा यांनी एक व्हिडीओ शेअर करून यात काही तथ्य आहे की केवळ अफवा आहे याबाबत माहिती दिली.
ब्लॅंकेटने खरंच कॅन्सर होतो का?
डॉक्टर जयेश शर्मा सांगतात की, ब्लॅंकेट पॉलिएस्टरचे बनवलेले असतात. हे खरंय. पीएफएएस आपल्यासाठी घातक असतं हेही खरंय. पॉलिएस्टर बनवण्यासाठी अॅंटीमनीसारख्या रसायनांचा वापर केला जातो. अॅंटीमनीचा कॅन्सरसोबत संबंध असण्याचेही पुरावे आहेत. पण जर आपण किंना लहान मुलं ब्लॅंकेट घेऊन झोपत असतील तर कॅन्सर होईल, लहान मुलांना पीसीओडी होईल हे चुकीचं आहे. मुळात अॅंटीमनी एक कॅटलिस्ट असतं, ज्याचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो. हे प्लास्टिकपेक्षा जड असतं आणि महागही असतं. त्यामुळे प्लास्टिकसोबत फ्रीमध्ये अॅंटीमनी देणं ना कंपनीसाठी चांगलं आहे, ना आपल्या आरोग्यासाठी.
जर ब्लॅंकेटमध्ये हे कमी प्रमाणात असलं तरी ते त्वचेतून शरीराच्या आत जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अॅंटीमनीने ब्लॅंकेटच्या माध्यमातून कॅन्सर होण्याचा धोका नाही. पीएफएएस एक असं तत्व आहे जे गोष्टी वॉटर प्रूफ बनवण्यासाठी वापरलं जातं. ब्लॅंकेटमध्ये पीएफएएस एकतर नसतं किंवा असेल तर फार कमी प्रमाणात असतं.
प्लास्टिक किंवा कॉटनचे फुप्फुसात गेल्यास नुकसान
प्लास्टिक कमी करण्याचं आणखी एक कारण म्हणजे मायक्राफायबर आणि मायक्रोप्लास्टिक जे ब्लॅंकेटमधून श्वास घेतल्यास आपल्या फुप्फुसात जाऊ शकतात. जर यांचे कण फुप्फुसांमध्ये जास्त प्रमाणात जात असतील तर यामुळे इरिटेशन होऊ शकते. अॅलर्जी होऊ शकते.
रूईच्या दुलईत फंगसचा धोका
तसे तर कॉटनचे आपले काही धोके आहेत. कॉटनमध्ये फंगस तयार होण्याचा धोका असतो. धूळ-माती जमा होण्याचा धोका असतो. ज्यात अनेक बॅक्टेरिया तयार होतात. रूईच्या दुलईतून येणारा वास हा त्यामुळेच येतो. फंगस आणि ओलावा यामुळे कुब्बट वास येतो. पण थंडीत रूईची दुलई जास्त चांगली असते. पण उशीमध्येही मायक्रोफायबर असतं, त्याबाबतही असंच म्हटलं जातं. अशा बातम्या जरा आणखी वाढवून दिल्या जातात, ज्यामुळे झोपेचं खोबरं होतं. आणि झोप जर झाली नाही तर आपल्या शरीराचं अधिक जास्त नुकसान होईल.
