Join us

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं? ‘हा’ त्रास असेल तर काही गोष्टी तातडीने बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 20:04 IST

Health Tips : असं का होतं आणि हे सामान्य असतं का?

Health Tips : सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही क्रिया गरजेची असते. ही क्रिया पचन तंत्राचा महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे शरीरातून अपशिष्ट पदार्थ बाहेर निघतात. एक निरोगी व्यक्ती रोज टॉयलेटला जाते. त्याशिवाय दिवसातून दोन वेळा आणि आठवड्यातून तीन वेळ संडासला जाणं सामान्य मानलं जातं. पण असे बरेच लोक असतात, जे जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण असं का होतं आणि हे सामान्य असतं का? 

रोज पोट साफ होणं हे सगळ्यांसाठी फार गरजेचं असतं. कारण याद्वारे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. जवळपास प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून एकदा संडासला जाणं गरजेचं असतं. पण जर रोज पोट साफ होत नसेल, याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला काही समस्य आहे. दिवसातून तीनदा सुद्धा संडासला जाणं नॉर्मल असतं. 

याबाबत अमेरिकन डॉक्टर सौरभ सेठी सांगतात की, असं होणं फारच सामान्य आहे. असं गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स (Gastrocolic Reflex) नावाच्या गोष्टीमुळे होतं. जेव्हा अन्न पोटात पोहोचतं, तेव्हा  असं जाणवतं की,  टॉयलेटला जाण्याची गरज आहे. 

काय कराल उपाय?

- जर तुम्हाला काही खाल्ल्यावर टॉयलेटला जावं लागत असेल तर प्रयत्न करा की, छोट्या छोट्या भागात खा आणि खूप जास्त खाऊ नका.

- आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जसे की, ओट्स, केळी. पूर्ण पिकलेल्या ऐवजी थोडं कच्चं केळ खा.

- असे पदार्थ खाणं टाळा जे तुमच्या लक्षणांना ट्रिगर करू शकतात, जसे की, हाय फॅट, मसालेदार आणि कॅफीनयुक्त पदार्थ.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स