Join us

तुम्हालाही हिवाळ्यात वस्तू किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यास शॉक लागतो? जाणून घ्या कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:01 IST

Occurs current in winter in human body : थंडीच्या दिवसात होणारी ही एक सामान्य बाब आहे. अशाप्रकारे शॉक लागण्याला स्ट्रिक्टिक डिस्चार्ज किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज असं म्हणतात.

occurs current in winter in human body : थंडीचा पारा सध्या सगळीकडे चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी सकाळी आणि रात्री लोकांचं घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे. या दिवसात अनेक अनुभव येत असेल की, एखादी वस्तू किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यावर शॉक बसतो. या दिवसात होणारी ही एक सामान्य बाब आहे. अशाप्रकारे शॉक लागण्याला स्ट्रिक्टिक डिस्चार्ज किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज असं म्हणतात.

यामागचं कारण वातावरणात ओलावा, दमटपणा कमी असणे आणि शरीरात स्टॅटिक वीज जमा होणे हे आहे. स्टॅटिक ऊर्जा शरीरात किंवा एखाद्या तेव्हा बनते जेव्हा इलेक्ट्रॉल जमा होतात. अशात तुम्ही कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करता तेव्हा इलेक्ट्रिक शॉक बसतो.

शॉक लागण्याची कारणं

अशाप्रकारे शॉक लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे या दिवसात भरपूर लोक सिंथेटिक कपडे वापतात. या कपड्यातील फायबर इलेक्ट्रॉन्सना सहजपणे अवशोषित करतात. अशात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा धातुच्या वस्तूला स्पर्श करता तेव्हा झटका बसतो.

तसेच थंडीच्या दिवसात वाहणाऱ्या शुष्क हवेमुले त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. ज्यामुळे इलेक्ट्रॉन्स सहजपणे जमा होतात आणि एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला स्पर्श केल्यावर शॉक लागतो.

शॉक लागून नये म्हणून उपाय

- जेव्हाही तुम्ही एखाद्या धातुच्या वस्तूला स्पर्श करणार असाल तेव्हा पायाने जमिनीला स्पर्श करा. असं केल्यास शरीरात जमा झालेली स्टॅटिक ऊर्जा निघून जाईल.

- त्याशिवाय त्वचेमध्ये ओलावा कायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायजर किंवा लोशन लावा. याने शरीरात स्टॅटिक ऊर्जा जमा होण्याचा चान्स कमी होतो.

- तसेच या दिवसात सुती कपड्यांचा वापर करा. यानेही स्टॅटिक ऊर्जा जमा होण्याची शक्यता कमी होते.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य