Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हनुवटीवर अचानकच केस वाढू लागले? ३ चुका टाळा, केस येणं आपोआप बंद होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2026 15:49 IST

Why do some women gets hair on chin?: तिशी पस्तिशीतल्या महिलांच्या बाबतीत असं होतं की हनुवटीवर अचानक एखादा केस दिसू लागतो.. असं का होतं?(reasons for hair growth on chin in case of some women)

चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे केस असणं महिलांच्या दृष्टीने सौंदर्याला मारकच ठरतं. म्हणूनच तर नियमितपणे फोर हेड, अप्पर लिप्स अशा ट्रिटमेंट्स बहुतांश महिला करतात. पण साधारण वय वर्षे ३० ते ३५ झाल्यावर काही महिलांच्या बाबतीत असं होतं की त्यांच्या हनुवटीवर एक- दोन बारीक केस उगवलेले दिसतात. हे केस सुरुवातीला कापून टाकले जातात. पण नंतर ते येण्याचं प्रमाण वाढत जातं. शरीरात नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे हनुवटीवर केस येऊ लागतात? त्याविषयीचीच ही माहिती..(Why do some women gets hair on chin?)

 

ठराविक वयानंतर काही महिलांच्या हनुवटीवर केस का दिसतात?

याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.smita_peachtreeclinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात की शरीरातला एंड्रोजिन हा पुरुषी हार्मोन वाढला की महिलांच्या हनुवटीवर केस यायला सुरुवात होते. हा हार्मोन वाढण्याची कारणं म्हणजे चुकीची लाइफस्टाइल. साखरेचे पदार्थ तसेच कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात खाणे, रात्री नियमितपणे होणारे जागरण, स्ट्रेस लेवल वाढणे या सगळ्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढून शरीरातले एंड्रोजिन वाढते. हे केस येणं जर तुम्हाला नैसर्गिकपणे बंद करायचं असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून बघा. 

 

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपली लाईफस्टाईल बदलायला हवी. आहारातले साखरेचे आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण नियंत्रित ठेवायला हवे.  

२. रात्री नियमित आणि पुरेशी झोप घ्यायलाच हवी. रोज रात्री ७ ते ८ तासाची शांत झोप मिळायला हवी. 

१ ग्रॅम सोन्यात सुंदर ठसठशीत कानातले, ८ डिझाईन्स-प्रत्येक डिझाईन पाहताक्षणी आवडेल इतकी सुंदर

३. याशिवाय जवसाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या.

४. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीच्या बिया एक ग्लास पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि प्या. हे काही उपाय नियमितपणे केल्यास हनुवटीवर येणारे केस तसेच हार्मोनल इंबॅलन्समुळे होणारे इतर त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chin hair growth? Avoid these mistakes to stop it naturally.

Web Summary : Unwanted chin hair in women can be due to hormonal imbalance caused by poor lifestyle, diet and stress. Control sugar intake, sleep well, include flax and pumpkin seeds in your diet, and drink fenugreek seed water to naturally reduce hair growth.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिला