Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लहान मुलं किंवा काही लोकांना खडू - माती खाण्याची सवय का असते? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:02 IST

Reason for Craving Soil or Clay: खासकरून जर ही सवय जास्त काळ राहिली तर याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. जर वेळीच यावर नियंत्रण मिळवलं तर आरोग्याचं नुकसान होणार नाही.

Reason for Craving Soil or Clay: बऱ्याचदा आपण बघतो की, लहान मुलं खडू, माती किंवा कागद खातात. मुले लहान असतात त्यांना काही कळत नाही असं म्हणून पालक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा तर मोठे लोकही या गोष्टी खाऊ लागतात. ही एक चुकीची सवय मानली जाते. पण हेल्थ एक्सपर्टनुसार या गोष्टी खाण्याची सवय आरोग्यासंबंधी एखाद्या समस्येचा संकेत असू शकते. खासकरून जर ही सवय जास्त काळ राहिली तर याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. जर वेळीच यावर नियंत्रण मिळवलं तर आरोग्याचं नुकसान होणार नाही.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सेहरावत यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात त्या सांगतात की, खडू, माती किंवा कागद खाण्याची सवय एक ईटिंग डिसऑर्डर आहे. याला पिका ईटिंग डिसऑर्डर म्हटलं जातं. अनेक लोक तक्रार घेऊन क्लीनिकमध्ये येतात की, कधी कधी माती किंवा खडू खाण्याची क्रेविंग फार जास्त होते. 

पिका ईटिंग डिसऑर्डर काय आहे?

पिका एक अशी कंडिशन आहे, ज्यात व्यक्तीला कमीत कमी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत न खाण्याची गोष्टी खाण्याची इच्छा होते. ही समस्या लहान मुलं, गर्भवती महिला आणि मेंटल डिसऑर्डरने ग्रस्त लोकांमध्ये जास्त बघायला मिळते. जर वेळीच याचं कारण शोधलं तर पचनासंबंधी समस्या, इन्फेक्शन किंवा टॉक्सिसिटीसारखी समस्या होऊ शकते. जर आपली मुलं खूप दिवसांपासून या गोष्टी खात असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

खडू, माती खाण्याची कारणं...

डॉ. सेहरावत यांच्यानुसार, पिकाचं सगळ्यात सामान्य कारण म्हणजे आयर्नची कमतरता. आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनीमिया होऊ शकतो, ज्यामुळे थकवा, चक्कर आणि कमजोर अशी लक्षणं दिसतात. अशात शरीर असामान्य गोष्टी खाण्याच्या इच्छेच्या माध्यमातून संकेत देतं की, त्याला पोषक तत्वांची गरज आहे. जर कुणाला माती, खडू किंवा कागद खाण्याची इच्छा होत असेल, तर लगेच ब्लड टेस्ट करून आयर्नची लेव्हल चेक केली पाहिजे. तेव्हाच नेमकं कारण समोर येईल. 

डॉक्टरांचा सल्ला

डॉ. सेहरावत सल्ला देतात की, आयर्नची कमतरता योग्य डाएट आणि सप्लीमेंटच्या मदतीने सुधारली जाऊ शकते. रोज खजूर, किशमिश, गूळ, ड्रायफ्रूट्स, हिरव्या पालेभाज्या आणि आयर्न असलेले धान्य खावेत. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न सप्लीमेंट घ्या. त्याशिवाय वेळोवेळी रक्ताची टेस्ट करून आयर्नची लेव्हल चेक करा. 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, पिकाकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ही सवय शरीरात पोषणाची कमतरता असल्याचा संकेत असू शकते. वेळीच याची ओळख पटवली आणि उपचार घेतले तर ही समस्या रोखली जाऊ शकते. जर आपल्याला किंवा आपल्या मुलांना अशा गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल तर याला केवळ सामान्य सवय समजू नका. वेळीच डॉक्टरांना दाखवून योग्य ते उपाय करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Why kids crave chalk, soil? Doctors explain the reason.

Web Summary : Craving chalk or soil, known as Pica, often signals nutritional deficiencies, especially iron. It's common in kids, pregnant women, and those with mental disorders. Doctors advise blood tests to check iron levels and suggest diet changes or supplements.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स