Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कितीही गरम होत असलं तरी पांघरूण हवंच, का पांघरूणाशिवाय काहींना येत नाही झोप? पाहा कारणं...

कितीही गरम होत असलं तरी पांघरूण हवंच, का पांघरूणाशिवाय काहींना येत नाही झोप? पाहा कारणं...

Sleeping Habit : लोकांच्या झोपेच्या सवयी वेगवेगळ्या असतात. आपण पाहिलं असेल की, काही लोक गरमीत सुद्धा पांघरूण घेऊन झोपतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:33 IST2025-08-09T10:32:04+5:302025-08-09T10:33:27+5:30

Sleeping Habit : लोकांच्या झोपेच्या सवयी वेगवेगळ्या असतात. आपण पाहिलं असेल की, काही लोक गरमीत सुद्धा पांघरूण घेऊन झोपतात.

Why some people cant sleep without a blanket know the reasons | कितीही गरम होत असलं तरी पांघरूण हवंच, का पांघरूणाशिवाय काहींना येत नाही झोप? पाहा कारणं...

कितीही गरम होत असलं तरी पांघरूण हवंच, का पांघरूणाशिवाय काहींना येत नाही झोप? पाहा कारणं...

Sleeping Habit : झोप ही तब्येत चांगली ठेवण्यासाठी, थकवा घालण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते. दिवसभर भरपूर काम केल्यावर आलेला थकवा झोपेशिवाय दूर होत नाही. कारण शरीर झोपेत रिपेअर होत असतं. ज्यामुळे सकाळी फ्रेश वाटतं आणि पुन्हा कामासाठी एनर्जी मिळते. म्हणूनच लोक चांगली झोप येण्यासाठी किंवा घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. लोकांच्या झोपेच्या सवयी वेगवेगळ्या असतात. आपण पाहिलं असेल की, काही लोक गरमीत सुद्धा पांघरूण घेऊन झोपतात.

हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात पांघरूण घेऊन झोपणं एकवेळ समजू शकतं. पण गरमीत सुद्धा काही लोक जाडजूड पांघरूण घेऊन झोपतात. अशात आपल्याला सुद्धा घरातील कुणाला असं करताना पाहून प्रश्न पडला असेल की, इतक्या गरमीतही पांघरूण घेऊन का झोपत असतील? यामागचं कारण आपण समजून घेणार आहोत.

पांघरूण आणि झोप न येण्याचं कनेक्शन

जर्नल ऑफ स्लीप मेडिसीन अ‍ॅन्ड डिसऑर्डर्समध्ये २०१५ मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जड पांघरूणाखाली झोपल्यानं रात्री चांगली झोप येते. अमेरिकन जर्नल ऑफ ऑक्यूपेशनल थेरपीमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, जड पांघरूण एंझायटी आणि झोप न येण्याची समस्या असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात.

जुनी सवय

झोपताना पांघरूण घेण्याची सवय आपल्याला बालपणापासून असते. स्वत:ला ब्लॅकेट किंवा चादरीनं झाकून घेणं सर्केडिअन रिदमचा भाग आहे. असं केल्यानं आपल्याला हे ठरवण्यास मदत मिळते की, आपलं शरीर झोपण्यासाठी कधी तयार आहे आणि उठण्यासाठी कधी तयार आहे. ही सवय जन्मापासून लागते आणि अनेकांमध्ये मोठे झाल्यावरही राहते.

सुरक्षित वाटतं

पांघरूण घेऊन झोपण्यामागचं एक कारण मानसिकही असतं. पांघरूणाची उबेनं आपल्याला रात्री सुरक्षित वाटतं. झोपताना अनेकांना अंधाराची भिती वाटते, तेव्हा हे लोक पांघरूण घेऊन ही भिती घालवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांच्या डोक्यात फिट झालेलं असतं की, पांघरूणानं सुरक्षित वाटतं. म्हणूनच काही लोक कितीही गरम होत असलं तरी पांघरूण झोपतात. हे आपल्याला विचित्र वाटू शकतं, पण त्यांच्यासाठी महत्वाचं असतं.

थंडीपासून बचावासाठी

जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर आराम करत असतं. त्यामुळे तापमान कमी होतं. सकाळी ४ वाजतादरम्यान शरीराचं तापमान अधिक जास्त कमी होतं. ही प्रक्रिया झोपायला जाण्याच्या एक तास आधी सुरू होते. अशात ब्लॅंकेट किंवा चादरीनं उब मिळते आणि थंडीपासून बचाव होतो.

Web Title: Why some people cant sleep without a blanket know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.