Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्टाइल मारायची म्हणून पायावर पाय ठेवून बसणं ठरतंय घातक, पाहा काय होतंय नुकसान..

स्टाइल मारायची म्हणून पायावर पाय ठेवून बसणं ठरतंय घातक, पाहा काय होतंय नुकसान..

या पद्धतीनं बसणं चांगलं दिसत असेल आणि तुम्हाला आरामही मिळते असेल, पण आरोग्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:35 IST2025-03-04T10:56:29+5:302025-03-04T15:35:20+5:30

या पद्धतीनं बसणं चांगलं दिसत असेल आणि तुम्हाला आरामही मिळते असेल, पण आरोग्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकतं.

Why sitting with crossed legs could be bad for you, Know its side effects | स्टाइल मारायची म्हणून पायावर पाय ठेवून बसणं ठरतंय घातक, पाहा काय होतंय नुकसान..

स्टाइल मारायची म्हणून पायावर पाय ठेवून बसणं ठरतंय घातक, पाहा काय होतंय नुकसान..

केवळ महिलाच नाही तर अनेक पुरूषांना एका पायावर दुसरा पाय ठेवून बसण्याची सवय असते. अशा पद्धतीनं बसणं एक स्टाईल स्टेटमेंटही म्हटलं जातं. या पद्धतीनं बसणं चांगलं दिसत असेल आणि तुम्हाला आरामही मिळते असेल, पण आरोग्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. अनेक एक्सपर्ट वारंवार सांगतात की, पाय क्रॉस करून बसल्यानं व्हेरिकोज व्हेंस म्हणजे नसांवर सूज येते आणि गर्भवती महिलांमध्ये डिलिव्हरीसंबंधी समस्या होऊ शकतात. इतकंच नाही तर यामुळं हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो.

पायावर पाय ठेवून बसण्याचे नुकसान

व्हेरिकोज व्हेंस आणि प्रेग्नेन्सीसंबंधी समस्या

नेहमीच खूप जास्त वेळ पायावर पाय ठेवून बसल्यानं रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे व्हेरिकोज व्हेंज म्हणजे नसांवर सूज येण्याची समस्या होऊ शकते. तसेच बसण्याची ही पद्धत गर्भवती महिलांसाठी जास्त नुकसानकारक ठरू शकते. यादरम्यान रक्तप्रवाह स्लो होतो आणि त्यामुळे पायांमध्ये वेदना, सूज आणि थकवा जाणवू शकतो. तसेच अशा स्थितीत बसल्यानं भ्रूणाच्या स्थितीवरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्यामुळे डिलिव्हरीसंबंधी समस्याही होऊ शकतात.

हाय ब्लड प्रेशर

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, पायांना क्रॉस करून बसल्यानं ब्लड प्रेशर ८ टक्क्यांनी वाढू शकता. कारण या पोश्चरमध्ये बसल्यानं दमण्यांवर दबाव पडतो. ज्यामुळे हृदयाला आणखी मेहनत करावी लागते. त्यामुळे तुम्हाला आधीच ब्लड प्रेशरसंबंधी समस्या असेल तर या पोश्चरमध्ये बसणं टाळलं पाहिजे.

पाठदुखी आणि स्नायूंमध्ये ताण

पायावर पाय ठेवून बसल्यानं पाठीच्या स्नायूंमध्ये तणाव वाढतो, ज्यामुळे पाठदुखीची समस्या होते. तसेच स्नायूंमध्ये ताण वाढतो. यानं मानेत आणि खांद्यांमध्येही वेदना होतात

कसा कराल बचाव?

पाय एकावर एक ठेवून बसण्याऐवजी पाठ सरळ ठेवा आणि पाय समान लेव्हलला खाली ठेवा. जर एकाच जागी जास्त वेळ बसायचं असेल तर दर २० ते ३० मिनिटांनी बसण्याची स्थिती बदला. दर एक तासानं जागेवरून उठा आणि थोडं चाला. त्याशिवाय नियमित व्यायाम करा. यानं स्नायू मजबूत होतील आणि लवचिकताही वाढेल.

Web Title: Why sitting with crossed legs could be bad for you, Know its side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.