Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूध हळद आवडत नाही तर हळद पाणी ‘यावेळी’ प्या, पाहा हळदीचं पाणी पिण्याचे ५ फायदे

दूध हळद आवडत नाही तर हळद पाणी ‘यावेळी’ प्या, पाहा हळदीचं पाणी पिण्याचे ५ फायदे

Turmeric Water Drinking Benefits : हे पाणी पिण्याची सवय उत्तम मानली जाते कारण आयुर्वेद आणि अधुनिक विज्ञानानुसारही हळदीचं पाणी शरीरासाठी अमृत मानलं जातं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:24 IST2026-02-01T15:13:04+5:302026-02-02T16:24:54+5:30

Turmeric Water Drinking Benefits : हे पाणी पिण्याची सवय उत्तम मानली जाते कारण आयुर्वेद आणि अधुनिक विज्ञानानुसारही हळदीचं पाणी शरीरासाठी अमृत मानलं जातं. 

Why Should You Drink Turmeric Water : Turmeric Water Drinking Health Benefits | दूध हळद आवडत नाही तर हळद पाणी ‘यावेळी’ प्या, पाहा हळदीचं पाणी पिण्याचे ५ फायदे

दूध हळद आवडत नाही तर हळद पाणी ‘यावेळी’ प्या, पाहा हळदीचं पाणी पिण्याचे ५ फायदे

हळद (Turmeric) भारतीय स्वंयपाकघरांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ आहे.  हळद आपल्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. हळदीत करक्यूमिन नावाचे तत्व असते. जे तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. हळदीमुळे फक्त भाजीची चव वाढत नाही तर तब्येतीला बरेच फायदे मिळतात. रोज हळदीचं पाणी प्यायल्यानं हळदीचं दूध पिण्याइतकेच  शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. (Turmeric Water Drinking Health Benefits)

हे पाणी पिण्याची सवय उत्तम मानली जाते कारण आयुर्वेद आणि अधुनिक विज्ञानानुसारही हळदीचं पाणी शरीरासाठी अमृत मानलं जातं. हळदीत एंटी बॅक्टेरिअल, एंटी व्हायरल आणि एंटी फंगल गुणधर्म असतात. रोज याचे सेवन केल्यानं शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. ज्यामुळे सर्दी, फ्लू, संक्रमणापासून बचाव होण्यास मदत होते.

सांधेदुखीच्या वेदना कमी होतात
 
हळदीतील एंटी इफ्लेमेटरी गुणांमुळे शरीराला फायदे होतात. जर तुमच्या सांध्यांमध्ये वेदना होत असतील किंवा अर्थरायटीसची समस्या उद्भवत असेल तर हळदीचं पाणी सूज कमी करण्यासाठी एक नॅच्युरल पेनकिलरप्रमाणे काम करते. 

 पचनक्रिया सुधारते

 हळदीचं पाणी प्यायल्यानं अन्न पचणं सोपं जातं. याचा परिणाम मेटाबॉलिझ्मवर होतो. ज्यामुळे वजन कमी होते.

त्वचा चमकते आणि डिटॉक्सिफिकेशन

 हळद रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक उजळपणा दिसून येतो.

हद्याच्या आरोग्यासाठी उत्तम

कोलेस्टेरॉलची लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करून ब्लड वेसल्समध्ये गाठी तयार होण्यापासून रोखते ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

हळदीचे पाणी कसे तयार करावे?

 एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडा लिंबाचा रस किंवा मध घालून तु्म्ही हे पाणी पिऊ शकता. हळदीतील पोषक तत्वे शरीरात नीट शोषली जावीत यासाठी तुम्ही यात चिमूटभर काळी मिरी पूड घालू शकता. जे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. 

हळदीचं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

हळदीचं पाणी पिण्याची योग्यवेळ सकाळी असते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचं पाणी प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. सकाळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असते. यामुळे हळदीचे गुणधर्म शरीरात लवकर शोषले जातात. जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हे पाणी पिणं सुद्धा फायदेशीर ठरते.

Web Title : हल्दी दूध पसंद नहीं तो हल्दी पानी पिएं, पाएं स्वास्थ्य लाभ।

Web Summary : हल्दी पानी, हल्दी दूध के समान ही स्वास्थ्यवर्धक है। यह पाचन में सहायक, जोड़ों के दर्द को कम करने, त्वचा को डिटॉक्स करने और हृदय को स्वस्थ रखने में मदद करता है। इसे सुबह या सोने से पहले पिएं।

Web Title : Drink turmeric water for health benefits, if you dislike turmeric milk.

Web Summary : Turmeric water offers similar health benefits to turmeric milk, aiding digestion, reducing joint pain, detoxifying skin, and promoting heart health. Drink it in the morning or before bed.