Join us

रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवून झोपलं तर खरंच काही फायदा हाेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:17 IST

Garlic Under Pillow Health Benefits : लसणामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशल सुरळीत होतं. म्हणून लसूण हृदयरोग दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.

Garlic Under Pillow Health Benefits : लसूण जवळपास रोज जास्तीत जास्त भारतीय भाज्या किंवा पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय पदार्थांना टेस्टच येत नाही. लसणानं जेवणाला टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्याला सुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त फायदे मिळतात. त्यामुळे आयुर्वेदात सुद्धा लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. लसणामुळे शरीरातील ब्लड  सर्क्युलेशन सुरळीत होतं. म्हणून लसूण हृदयरोग दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.

अनेक एक्सपर्ट नेहमीच रोज सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देत असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ लसूण खाऊनच याचे फायदे मिळतात असं नाही. लसूण न खाताही तुम्हाला याचे फायदे मिळू शकतात. पूर्वी लोक झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवायचे. आता यानं काय होतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्याचंच उत्तर जाणून घेऊया.

लसणातील पोषक तत्वं

लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचं औषधी तत्त्व असतं. त्यामुळ फंगस, बॅक्टेरिया दूर होण्यास मदत मिळते.

घरातील हवा शुद्धा करतो लसूण

तुम्ही ऐकलं असेल की, पूर्वी घराच्या एखाद्या कोपऱ्यात लसूण बांधून ठेवत होते. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची कळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

झोप चांगली लागते

असं मानलं जातं की, उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपल्यानं झोपेची क्वालिटी सुधारते आणि झोपेसंबंधी इतरही समस्या दूर होतात. याचं कारण लसणामध्ये सल्फर असतं. ज्याच्या गंधामुळे तुम्हाला शांत वाटतं आणि झोप चांगली येते.

नकारात्मक ऊर्जा दूर होते

लसूण नकारात्मक उर्जा खेचून घेतो आणि सकारात्मक उर्जा देतो. त्यामुळे आजही अनेक लोक लसणाची एक कळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

कफ दूर होतो

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.

गॅस होत नाही

पोटात गॅस तयार होण्याची समस्या लसूण दूर करतो. लसूण हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो. लसणाचा गंध या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स