PCOS Causes : आजकाल शहरांमधील महिलांमध्ये PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम म्हणजेच लठ्ठपणा आणि हार्मोनल असंतुलन वेगाने वाढणारी समस्या बनली आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे वेगाने बदलत असलेली लाइफस्टाईल. शहरांमध्ये राहणीमान आणि खाण्या-पिण्यात खूप बदल झाला आहे. ज्यामुळे महिलांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. यासंबंधी कारणं आणि त्यावर उपायांबाबत दिल्लीचे डॉ. मनन गुप्ता यांनी एका वेबसाइटला माहिती दिली. पाहुयात काय म्हणाले डॉक्टर.
आधुनिक जीवनशैली
शहरांमध्ये रोजचं रूटीन हे धावपळीचं, स्ट्रेसफुल आणि सेडेंटरी असतं. जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणं, फिजिकल अॅक्टिविटी कमी करणं आणि झोपेची कमतरता यामुळे नॅचरल सार्केडिअन रिदम बिघडतो. यामुळे इन्सुलिन रेजिस्टेन्स, थायरॉइड अंसतुलन आणि स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. ज्याचा थेट संबंध PCOS आणि वजन वाढण्याशी आहे.
डाएटमध्ये बदल
शहरी जेवणामध्ये प्रोसेस्ड फूड, रिफाइंड कार्ब्स, शुगर असलेले ड्रिंक आणि अनहेल्दी फॅट भरपूर असतात. या डाएटमुळे केवळ लठ्ठपणाच नाही तर शरीरात सूज आणि इन्सुलिन रेजिस्टेन्स वाढतो. सोबतच पोषक तत्वांची कमतरता, खासकरून व्हिटामिन डी, आयर्न आणि ओमेगा-३ या गोष्टी हार्मोन्सना प्रभावित करतात.
पर्यावरण आणि प्रदूषण
शहरांमध्ये शहरांमध्ये वायु प्रदूषण, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे एंडोक्राइन-डिसरप्टिंग केमिकल्स आणि फळं-भाज्यांवर होणारा कीटकनाशकांचा अधिक वापर यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं.
स्ट्रेस
करिअरमध्ये वाढत असलेली स्पर्धा, घराच्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षांमुळे शहरी महिलांवर मानसिक दबाव टाकतात. हा दबाव जर जास्त काळ राहिला तर स्ट्रेसमुळे कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे रिप्रोडक्टिव हार्मोन्स प्रभावित होऊन PCOS ची लक्षणं वाढतात. पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढू लागते.
बचावासाठी काय करावे?
या आव्हानांचा सामना करण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे आवश्यक आहे.
हेल्दी डाएट: फायबरयुक्त अन्न, प्रोटीन, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. साखर आणि प्रोसेस्ड फूड टाळा.
नियमित व्यायाम: आठवड्यातून ५ दिवस ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करा. यामध्ये योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओचा समावेश असावा.
स्ट्रेस मॅनेजमेंट: मेडिटेशन, प्राणायाम, पुरेशी झोप (७-८ तास) घ्या आणि आवडीच्या छंदांसाठी वेळ काढा.
Web Summary : Urban women face rising PCOS and obesity due to lifestyle changes, diet, pollution, and stress. Doctors recommend a healthy diet, regular exercise, and stress management techniques for prevention.
Web Summary : शहरी महिलाओं में जीवनशैली, आहार, प्रदूषण और तनाव के कारण पीसीओएस और मोटापा बढ़ रहा है। डॉक्टर रोकथाम के लिए स्वस्थ आहार, नियमित व्यायाम और तनाव प्रबंधन तकनीकों की सलाह देते हैं।