Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कानाजवळ गजर वाजूनही उठावं का वाटत नाही, का सकाळी सकाळीच गाढ झोप लागते? पाहा नेमकं असं का होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:17 IST

Morning Deep Sleep Facts : रात्रीपेक्षा सकाळी फारच गाढ आणि चांगली झोप लागते, जी कधीच मोडू नये असं सगळ्यांना वाटत असतं. असं का होतं, म्हणजे सकाळी इतकी चांगली झोप का लागते? हेच आपण समजून घेणार आहोत.  

Morning Deep Sleep Facts : रात्री कितीही वेळ बेडवर पडून राहिल्यावर पटकन झोप न येण्याची समस्या अनेकांना होते. पण अनेकांना असा अनुभव येतो की, सकाळी कानाजवळ जोरात अलार्म वाजूनही डोळे काही केल्या उघडत नाही. सकाळी लागलेली साखर झोप मोडून ऑफिसला किंवा शाळेत जाण्याचाही कंटाळा येतो. आपण पाहिलं असेल की, रात्रीपेक्षा सकाळी फारच गाढ आणि चांगली झोप लागते, जी कधीच मोडू नये असं सगळ्यांना वाटत असतं. असं का होतं, म्हणजे सकाळी इतकी चांगली झोप का लागते? हेच आपण समजून घेणार आहोत.  

स्लीप फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार, सकाळी चांगली गाढ झोप लागण्याचं कारण आपल्या शरीराचं सर्केडिअन रिदम आहे. हे शरीराचं बायोलॉजिकल घड्याळ असतं, जे आपल्या झोप-जागण्याचा पॅटर्न कंट्रोल करतं. हेच घड्याळ रात्री आपल्याला झोपण्यासाठी तयार करते, तर सकाळी जागण्यासाठी. इंटरेस्टिंग बाब म्हणजे सकाळच्या ठेवटच्या तासांमध्ये ही घड्याळ हळूहळू झोपेला हलकी करते, ज्यामुळे आपण रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप स्टेजमध्ये जास्त वेळ घालवतो. हीच ती स्टेज असते ज्यात आपल्याला स्वप्ने येतात आणि झोप जास्त चांगली लागते. 

रॅपिड आय मुव्हमेंट वाढल्याने सकाळी-सकाळी गाढ झोप लागते. या स्टेजमधील झोप मानसिक रूपाने जास्त सक्रिय होते. यात व्यक्तीला आराम आणि आनंद मिळतो. त्यामुळे सकाळच्या झोपेला साखरझोप म्हटलं जातं. सकाळी सकाळी चांगली झोप येण्याचं आणखी एक कारण म्हणजे हार्मोन्स. मेटाटोनिन आणि कोर्टिसोल हार्मोन्स याचं मुख्य कारण असतात. रात्री मेटाटोनिन हार्मोनची लेव्हल अधिक असते, ज्यामुळे झोप लागते. सकाळ होताच यांची लेव्हल कमी होते आणि स्ट्रेस वाढवणाऱ्या कोर्टिसोलची लेव्हल वाढते. ज्यामुळे शरीराला जाग येते. यांच्या बदलाची वेळ फार कमी असते, पण जेव्हा दोन्ही हार्मोन संतुलनात असतात, तेव्हा झोप फार चांगली लागते.

जर एखाद्या व्यक्तीला रात्री पुरेशी आणि चांगली झोप येत नसेल तर तेव्हा त्याचं शरीर सकाळी जास्त झोप घेण्याचा प्रयत्न करतं. हेच कारण आहे की, सुट्टीच्या दिवशी किंवा जेव्हा आपल्याला उशीरापर्यंत झोपण्याची संधी मिळते, तेव्हा सकाळची झोप आणखीन गाढ आणि आरामदायक जाणवते. ही शरीराची एकप्रकारची रिकव्हरी प्रक्रिया असते. त्याशिवाय सकाळच्या वेळी सामान्यपणे सगळीकडे शांतता असते, आवाज कमी असतो आणि गारही वाटतं, त्यामुळे झोप चांगली लागते. सूर्याचा हळूहळू वाढणारा प्रकाश शरीरात जागण्याची प्रक्रिया सुरू करतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Why is it hard to wake up despite the alarm?

Web Summary : Morning deep sleep is linked to circadian rhythms and hormones. Inadequate sleep at night also causes deep morning sleep as the body attempts to recover. Quiet and cool environment enhances sleep.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य