भारतीय लोकांच्या शरीरात प्रोटीन्स कमी प्रमाणात असतात हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्यातही शाकाहारी लोकांमध्ये आणि विशेषत: महिलांमध्ये प्रोटीन्सची कमतरता तीव्र प्रमाणात दिसून येते. शरीरातले प्रोटीन्स कमी झाले की केस गळणं, नखे ठिसूळ होणं, सतत थकवा येणं असे त्रास तर होतातच, पण त्यासोबतच आरोग्याच्या इतर अनेक तक्रारीही डोकं वर काढतात. महिलांमध्ये तर या सगळ्या तक्रारी जरा जास्तच प्रमाणात दिसून येतात (main reasons behind protein deficiency in indian women). National Family Health Survey यांच्यावतीने याविषयी नुकताच एक अभ्यास केला असून त्यामध्ये त्यांनी भारतीय महिलांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता का जास्त असते, यामागची काही मुख्य कारणं सांगितली आहेत. ती कारणं नेमकी कोणती ते पाहूया...(Why many Indian women don’t meet daily protein requirements?)
कोणत्या कारणांमुळे भारतीय महिलांच्या शरीरात प्रोटीन्स कमी प्रमाणात असते?
१. स्वत:कडे दुर्लक्ष
हे यामागचं एक मुख्य कारण आहे. ८० टक्के भारतीय महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. घरच्या लोकांचं सगळं आवडीने, आनंदाने करतात. पण स्वत:साठी करण्याची वेळ आली की त्यांना नकोसं होतं.
उन्हाळ्यात घरभर पालीच्या पिलांचा सुळसुळाट, २ उपाय- एकही पाल घराच्या भिंतीवर दिसणार नाही..
त्यामुळेच तर स्वत:ची तब्येत, आहार, व्यायाम याबाबतीत त्या उदासीन असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वत:च्या शरीरात दिसत असणाऱ्या प्रोटीन्सच्या कमतरतेकडेही त्यांचं दुर्लक्ष होतं.
२. योग्य आहाराचा अभाव
घरातल्या सगळ्यांचं पोटभर जेवण झाल्यानंतर उरलं सुरलं खायचं असा भारतीय महिलांचा विचार असतो. त्यामुळे कधी त्यांना भाजी, कोशिंबीर असते तर कधी नसते. सगळ्यांबरोबर स्वत:चं ताट वाढून घेत नाहीत.
उडाला रंग झाला चांगल्या कपड्यांचा बेरंग, कपड्यांवरचे होळीचे डाग काढण्याचे ३ उपाय-न घासता न रगडता
रोजच असं होतं असं नाही. पण बहुतांश वेळा हे चित्र दिसून येतं. शिवाय सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी जेवायचं, त्यामुळे मग जेवणाच्या वेळाही टळून गेलेल्या असतात. म्हणूनच योग्य वेळी योग्य आहार न घेतल्यानेही प्रोटीन्सची कमतरता वाढत जाते.
३. ही कारणंही महत्त्वाची
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. प्रेग्नन्सी, बाळंतपण, ब्रेस्ट फिडिंग, कधी होणारे ॲबॉर्शन, मेनोपॉज अशा वेळी शरीरातले हार्मोन्सही बदलत जातात. या टप्प्यांवर शरीराला जास्त पौष्टिक पदार्थांची गरज असते. ती वेळोवेळी भागवली नाही तर प्रोटीन्ससोबतच इतरही कित्येक घटकांची कमतरता निर्माण होते.
Web Summary : Indian women often lack protein due to self-neglect, poor diet, and hormonal changes during life stages like pregnancy. This leads to various health issues.
Web Summary : भारतीय महिलाओं में प्रोटीन की कमी का कारण है खुद पर ध्यान न देना, गलत आहार और गर्भावस्था जैसे चरणों के दौरान हार्मोनल बदलाव। इससे कई स्वास्थ्य समस्याएं होती हैं।