Restless Legs Syndrome : सकाळी झोपेतून उठल्यापासून वेगवेगळी कामे करून शरीर थकल्यानंतर रात्रीची वेळ शरीराला आराम देण्याची असते. पण काही लोकांसाठी हीच वेळ अधिक त्रासदायक ठरते. म्हणजे काही लोक आरामासाठी बेडवर पडताच त्यांच्या पायांमध्ये मुंग्या, ताण किंवा वेगळाच त्रास जाणवतो. पाय हलवले किंवा चालले तर हा त्रास बंद होतो. पण पुन्हा जेव्हा आराम करायला लागतो तेव्हा त्रास पुन्हा सुरू होतो. अशात रात्री झोपायच्या वेळेला पायांमध्ये मुंग्या का येतात? याची कारणे समजून घेऊयात.
रेस्टलेस लेग्स सिंड्रोम?
रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (Restless Legs Syndrome) हा एक न्यूरोलॉजिकल आणि स्लीप डिसऑर्डर आहे. यात व्यक्तीला पाय पुन्हा पुन्हा हलवण्याची तीव्र इच्छा होते. व्यक्ती जेव्हा आरामाच्या स्थितीत असते तेव्हा ही समस्या अधिक वाढते. म्हणजे झोपले असताना किंवा जास्त वेळ बसलेले असताना असं जाणवतं की, पायात काहीतरी सरपटत आहे. आत खाज आणि जळजळ होऊ लागते. या त्रासामुळे झोपही चांगली लागत नाही. झोपेवेळी पुन्हा पुन्हा असं होत असेल तर दिवसभर थकवा, चिडचिड जाणवते आणि फोकस करण्यातही अडचण येते.
काय होते ही समस्या?
वैज्ञानिकांचं मत आहे की, या समस्येचा संबंध मेंदूतील डोपामाइन नावाच्या केमिकल्सशी जुळलेला असू शकतो. डोपामाइन शरीरातील स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतं. जेव्हा याचं संतुलन बिघडतं तेव्हा पाय सतत हलवण्याची इच्छा वाढते. त्याशिवाय आयर्नची कमतरता असणं देखील याचं एक मुख्य कारण असू शकतं. आयर्न कमी झाल्यावर मेंदूच्या कामावर आणि डोपामाइनच्या लेव्हलवर प्रभाव पडतो. हेच कारण आहे की, अॅनिमिया किंवा आयर्नची कमी असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते.
कुणाला जास्त धोका?
एक्सपर्ट सांगतात की, वाढत्या वयासोबत ही समस्या वाढू शकते. महिला आणि गर्भवती महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. तर काही केसेसमध्ये ही समस्या आनुवांशिक असू शकते. तेच डायबिटीस, किडनीचे आजार, नसांसंबंधी आजार आणि व्हिटामिनची कमतरता अशा स्थितीतही रेस्टलेस लेग्स सिंड्रोम ही समस्या होऊ शकते.
पायांना होणारा त्रास कसा दूर कराल?
एक्सपर्ट सांगतात की, पायांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि आहार संतुलित ठेवा. कॅफीनचं सेवन कमी करा, झोपण्याआधी हलकी स्ट्रेचिंग करा. आयर्न किंवा व्हिटामिनची कमतरता असेल तर ती भरून काढा. तसेच जर हा त्रास नेहमीच आणि जास्त होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Web Summary : Restless Legs Syndrome, a neurological disorder, causes an urge to move legs, especially at rest. Linked to dopamine imbalance and iron deficiency, it worsens with age. Exercise, balanced diet, and addressing deficiencies can help. Consult a doctor if persistent.
Web Summary : रेस्टलेस लेग्स सिंड्रोम, एक न्यूरोलॉजिकल विकार, पैरों को हिलाने की इच्छा पैदा करता है, खासकर आराम करते समय। डोपामाइन असंतुलन और आयरन की कमी से जुड़ा, यह उम्र के साथ बढ़ता है। व्यायाम, संतुलित आहार और कमियों को दूर करने से मदद मिल सकती है। लगातार रहने पर डॉक्टर से सलाह लें।