व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी हे दोन असे घटक आहेत ज्यांची कमतरता बहुसंख्य भारतीय लोकांच्या शरीरात दिसून येते. त्यातही जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या शरीरात हे दोन्ही घटक खूप कमी असतात. त्यापैकी व्हिटॅमिन D हे हाडांच्या मजबुतीसाठी अतिशय गरजेचे असते. कारण शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन D असेल तरच शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेतले जाते. व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे हाडांचे कित्येक आजार डोकं वर काढतात. पण बऱ्याच जणांच्या शरीरात व्हिटॅमिन D खूप कमी प्रमाणात असते. त्याची काय कारणं असू शकतात याविषयीचा अभ्यास डायग्नोस्टिक फॉर्म मेट्रोपॉलीस हेल्थ केअर लिमिटेड यांनी केला आहे.
या संस्थेने जवळपास ६ वर्षे हा अभ्यास केला आणि त्यामध्ये २० लाखांपेक्षाही जास्त लोकांवर संशोधन केले. त्यात असे आढळून आले की त्यापैकी जवळपास ४६% लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता होती.
ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज
तसेच २६% लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D पुरेशा प्रमाणात नव्हते. याची जी काही कारणं समोर आली आहेत ती असं सांगतात की शहरी जीवनामुळे लोक उन्हामध्ये खूप कमी वेळ थांबतात. तसेच खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये खूप बदल झालेले आहेत. त्यामुळे व्हिटॅमिन D चे प्रमाण कमी होत आहे.
१३ ते १८ वर्षे या वयाच्या मुलांमध्ये व्हिटॅमिन D चा स्तर चांगला असतो, असेही त्यावरून लक्षात आलेले आहे. तर पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात असते असेही समोर आले आहे.
काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करेल हळद- कॉफीचा 'हा' उपाय- टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल
भौगोलिक परिस्थितीनुसार जो अभ्यास केला गेला त्यात असे दिसले की दक्षिण भारतीय लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D कमी असून त्या तुलनेत उत्तर भारतीय लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D चांगले आहे.



