Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > साधं मीठ सोडून गुलाबी मिठाचा वापर करताय? आधी फायदे-नुकसान वाचा मग काय ते ठरवा...

साधं मीठ सोडून गुलाबी मिठाचा वापर करताय? आधी फायदे-नुकसान वाचा मग काय ते ठरवा...

Himalayan Pink Salt Side Effects : नॅचरल मिनरल्स आणि डिटॉक्सचे भरपूर गुण असूनही हे मीठ शरीरात आयोडिन कमी करू शकतं. डॉक्टरांनी हे मीठ खाण्याबाबत काही इशारे दिले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:42 IST2025-08-16T12:41:23+5:302025-08-16T12:42:15+5:30

Himalayan Pink Salt Side Effects : नॅचरल मिनरल्स आणि डिटॉक्सचे भरपूर गुण असूनही हे मीठ शरीरात आयोडिन कमी करू शकतं. डॉक्टरांनी हे मीठ खाण्याबाबत काही इशारे दिले आहेत. 

Why Himalayan salt is dangerous for health expert revealed the truth | साधं मीठ सोडून गुलाबी मिठाचा वापर करताय? आधी फायदे-नुकसान वाचा मग काय ते ठरवा...

साधं मीठ सोडून गुलाबी मिठाचा वापर करताय? आधी फायदे-नुकसान वाचा मग काय ते ठरवा...

Himalayan Pink Salt Side Effects : मिठाचा वापर रोज वेगवेगळ्या गोष्टींमध्ये केला जातो. मिठानं फक्त पदार्थांची टेस्ट वाढते असं नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण अलिकडे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मीठ वापरतात. बरेच लोक हिमालयन सॉल्टचा वापर करत आहेत. पण याचा वापर करत असताना याचे आरोग्याला फायदे होतात की नाही याचा विचारही केला जात नाही. आपणही नेहमीचं साधं मीठ सोडून वेगळं मीठ वापरत असाल तर सावध व्हा. कारण नॅचरल मिनरल्स आणि डिटॉक्सचे भरपूर गुण असूनही हे मीठ शरीरात आयोडिन कमी करू शकतं. डॉक्टरांनी हे मीठ खाण्याबाबत काही इशारे दिले आहेत. 

हिमालयन पिंक सॉल्ट फायदेशीर की नुकसानकारक?

हिमालयन पिंक सॉल्टला सैंधव मीठ असंही म्हटलं जातं. हे मीठ दिसायला गुलाबी असतं. यात कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण कमी असतं. नेहमीच्या मिठापेक्षा यात कमी सोडिअम असतं. या मिठाची टेस्ट गोड जास्त असते. केक आणि कुकीज बनवण्यासाठी या मिठाचा वापर केला जातो. 

'या' मिठानं आयोडिन कमी होतं का?

डॉ. अली काजेमी सांगतात की, भारतात आयोडिनची कमतरता असल्याच्या केसेस अचानक वाढल्या आहेत. कुपोषण वाढलं आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे हिमालनय सॉल्ट म्हणजेच सी सॉल्ट. ज्यात आयोडिन जास्त नसत.

आयोडिन गरजेचं

डॉक्टर सांगतात की, आयोडिन आपल्या शरीरातील एक महत्वाचं पोषक तत्व आहे. खासकरून थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य, प्रेग्नेंसीमध्ये भ्रूणाच्या मेंदूची वाढ आणि बाळाच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी खूप महत्वाचं असतं.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन(WHO) च्या एका शोधात, भारत, चीन, जर्मनी, इटली, मलेशिया आणि साउथ आफ्रिकासारख्या देशांमधील 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा समावेश करण्यात आला होता. या शोधातून आढळून आलं की, आयोडिन सप्लीमेंटेशननं आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारात आणि मृत्यूच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

अनेक एक्सपर्ट्स सांगतात की, हिमालयन सॉल्ट, रिफाइंड टेबल सॉल्टच्या तुलनेत काही बाबतीत अधिक चांगलं ठरू शकतं. पण आहारातून टेबल सॉल्ट पूर्णपणे बाजूला करून हिमालयन सॉल्ट खात असाल तर आयोडिन कमी होण्याचा धोका वाढू शकतो.

हिमालयन सॉल्टचे नुकसान

जास्त हिमायलन सॉल्टचा वापर कराल तर ब्लड प्रेशर लेव्हल वाढू शकते. कारण यात आयोडिन कमी असतं. ज्यामुळे हृदय आणि धमण्यांवर अधिक दबाव पडतो.
जर नेहमीच सैंधव मीठ खात असाल तर यामुळे थायरॉइडची समस्या वाढू शकते. कारण तेच यात आयोडिन कमी असतं.

जास्त सैंधव मीठ खाल्ल्यानं पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. ात मळमळ, उलटी, डायरिया यांचा समावेश असतो.

जास्त सैंधव मीठ खाल्ल्यानं शरीरातील फ्लूइडचं प्रमाण प्रभावित होतं. कारण सोडिअम सेल्समधून पाणी शोषूण घेतलं. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. 

ज्या लोकांना हृदय किंवा किडनीसंबंधी समस्या आहेत, त्यांनी चुकूनह सैंधव मीठ खाऊ नये. तसेच गर्भवती महिला आणि वृद्धांनी सुद्धा सैंधव मीठ खाणं टाळलं पाहिजे.

Web Title: Why Himalayan salt is dangerous for health expert revealed the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.