Join us
Daily Top 2 Weekly Top 5

जांभई दिल्यावर कान एकदम मोकळा होता-स्पष्ट ऐकू येतं, असं का? पाहा गमतीशीर कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:08 IST

Yawning Effect On Ears : आपणही अनेकदा अनुभवलं असेल की, जांभई घेतल्यानंतर कानाने फारच स्पष्ट ऐकायला येऊ लागतं. जांभई घेतल्यानंतर अचानक आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. यामागे शास्त्रीय कारण आहे.

Yawning Effect On Ears : जांभई येणं ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे काही लोकांना झोप आल्याने जांभई येते, तर काही लोकांना भूक लागल्याने जांभई येते. इतकंच नाही तर शरीरात जर काही बिघाड असला तरी काहींना भूक न लागता आणि झोप न येताही जांभई येते. जांभई दिली की, फारच मोकळं आणि हलकं वाटतं. गंमत म्हणजे काही लोक लाजत लाजत बारीकमध्ये जांभई देतात, तर काही लोक बिनधास्त मोठ्याने जांभई देतात. जांभई सगळ्यांनाच येते आणि सगळ्यांना याने बरं वाटतं. आपणही अनेकदा अनुभवलं असेल की, जांभई घेतल्यानंतर कानाने फारच स्पष्ट ऐकायला येऊ लागतं. जांभई घेतल्यानंतर अचानक आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. यामागे शास्त्रीय कारण आहे.

जांभई आणि कानांचा संबंध

मुळात आपल्या कानात एक छोटी नळी असते, तिला यूस्टेशियन ट्यूब म्हणतात. ही नळी मिडल इअर आणि घसा यांना जोडते. सामान्यपणे ती इतरवेळी बंद असते. पण जेव्हा आपण जांभई देतो, तेव्हा तोंड आणि जबड्यावर पडलेल्या ताणामुळे ती उघडली जाते.  त्यामुळे कानाच्या आत-बाहेरचा हवेचा दाब संतुलित होतो आणि आवाज स्पष्ट ऐकू येतो.

जांभईनंतर आवाज स्पष्ट का वाटतो?

जांभई घेताना कानातील दोन स्नायू सक्रिय होतात. Tensor tympani muscle आणि Stapedius muscle हे सक्रिय होतात. हे स्नायू काही क्षण कानातील हाडांना टाईट करतात, त्यामुळे थोड्या वेळासाठी आवाज कमी ऐकू येतो. नंतर हे रिलॅक्स झाल्यावर ऐकण्याची क्षमता सुधारते म्हणून आवाज अधिक क्लिअर वाटतो.

विमानात कान बंद का होतात?

विमान प्रवासात हवेचा दाब अचानक बदलतो, त्यामुळे कान बंद होतात. अशावेळी जांभई घेतल्याने यूस्टेशियन ट्यूब उघडते आणि दाब संतुलित होतो, त्यामुळे कान लगेच हलके वाटतात.

यामागचं आणखी कारण

जांभईमुळे शरीरात रक्तप्रवाह वाढतो. मेंदू अधिक सक्रिय होतो. त्यामुळे आपण आजूबाजूचे आवाज अधिक लक्षपूर्वक ऐकू शकतो

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, जांभई ही शरीराची एक नैसर्गिक डिफेन्स मेकॅनिज्म असू शकतं. ते कानातील स्नायूंना सक्रिय करून आतल्या आवाजांपासून जसे की, स्वतःचा आवाज, दात घासणे संरक्षण करतं. आणि बाहेरील आवाज अधिक स्पष्ट ऐकू येण्यास मदत करते

English
हिंदी सारांश
Web Title : Why does hearing sharpen after a yawn? The science explained.

Web Summary : Yawning opens the Eustachian tube, balancing ear pressure for clearer hearing. Muscles tighten briefly, then relax, enhancing sound perception. Increased blood flow and brain activity further sharpen auditory focus.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स