Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चॉकलेट की बिस्कीट ? दातांसाठी जास्त घातक काय, शाहरुख खान - हृतिकचे सेलिब्रिटी डेंटिस्ट सांगतात खास टिप्स...

चॉकलेट की बिस्कीट ? दातांसाठी जास्त घातक काय, शाहरुख खान - हृतिकचे सेलिब्रिटी डेंटिस्ट सांगतात खास टिप्स...

Why Glucose Biscuits Are Bad for Teeth Health : why biscuits are worse than chocolate for teeth : glucose biscuits harmful effects on teeth : biscuits vs chocolate teeth damage : दातांच्या आरोग्यासाठी चॉकलेट, बिस्कीट आणि इतर गोड पदार्थ किती आणि कसे हानिकारक आहेत ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2025 13:08 IST2025-09-29T12:56:04+5:302025-09-29T13:08:54+5:30

Why Glucose Biscuits Are Bad for Teeth Health : why biscuits are worse than chocolate for teeth : glucose biscuits harmful effects on teeth : biscuits vs chocolate teeth damage : दातांच्या आरोग्यासाठी चॉकलेट, बिस्कीट आणि इतर गोड पदार्थ किती आणि कसे हानिकारक आहेत ते पाहा...

Why Glucose Biscuits Are Bad for Teeth Health why biscuits are worse than chocolate for teeth glucose biscuits harmful effects on teeth | चॉकलेट की बिस्कीट ? दातांसाठी जास्त घातक काय, शाहरुख खान - हृतिकचे सेलिब्रिटी डेंटिस्ट सांगतात खास टिप्स...

चॉकलेट की बिस्कीट ? दातांसाठी जास्त घातक काय, शाहरुख खान - हृतिकचे सेलिब्रिटी डेंटिस्ट सांगतात खास टिप्स...

आपले दात आणि ओरल हेल्थची नेहमीच काळजी घेतो. ज्याप्रमाणे आपण शरीराच्या इतर भागांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे ओरल हेल्थची काळजी घेणे  देखील गरजेचे असते. जर तुमचे (Why Glucose Biscuits Are Bad for Teeth Health) दात आणि हिरड्या निरोगी असतील, तर अनेक प्रकारच्या (biscuits vs chocolate teeth damage) आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. दात खराब होण्यामागे किंवा किडण्यामागे अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. आपल्या खाण्यापिण्यातील काही असे पदार्थ असतात जे दात आणि हिरड्यांना गंभीर नुकसान पोहोचवतात(glucose biscuits harmful effects on teeth).

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट खूप आवडते, पण दात किडण्यामागे त्याला सर्वात मोठा दोष दिला जातो. परंतु सुपरस्टार शाहरुख खान व हृतिक रोशन यांचे सेलिब्रिटी डेंटिस्ट डॉ. रेवंत हिमात्सिंगका यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये, दातांच्या किडण्यासाठी चॉकलेटपेक्षा बिस्कीट जास्त घातक ठरतात असा खुलासा केला (why biscuits are worse than chocolate for teeth) आहे. दातांच्या आरोग्यासाठी चॉकलेट, बिस्कीट आणि इतर गोड पदार्थ किती आणि कसे हानिकारक आहेत ते पाहूयात. 

बिस्कीटपेक्षा चॉकलेट दातांसाठी जास्त हानिकारक आहेत कारणं... 

डॉक्टर रेवंत यांच्या म्हणण्यानुसार, दात किडण्यासाठी चॉकलेटपेक्षा बिस्किट अधिक धोकादायक असतात. वास्तविक पाहता, बिस्किटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि हे बिस्किट खाल्ल्यावर ते दातांना सहजपणे चिकटून राहतात, ज्यामुळे दातांमध्ये जीवाणू तयार होतात. हे जीवाणू आम्लयुक्त पदार्थ तयार करतात आणि दातांमध्ये छिद्र पाडतात, ज्याला 'कॅव्हिटी' असे म्हणतात.

हार्टचा त्रास- ब्लड प्रेशरची समस्या असेल तर कोणतं मीठ खावं? डॉक्टर सांगतात, मिठाचं योग्य प्रमाण आणि प्रकार...

इनॅमलचे होते नुकसान... 

डेंटिस्टच्यामते, बिस्किट दात आणि हिरड्यांना सहजपणे चिकटून राहतात. त्यामुळे ते तोंडात दीर्घकाळासाठी राहतात आणि तोंडात असलेले जीवाणू  त्यांच्यावर त्वरित प्रक्रिया करून अ‍ॅसिड तयार करतात, जे इनॅमलला (Enamel) नुकसान पोहोचवू शकते. याच कारणामुळे बिस्किटे दातांसाठी हानिकारक ठरतात. विशेषतः जर तुम्ही बिस्कीट वारंवार किंवा जास्त प्रमाणांत खात असाल, तर ते तुमची ओरल हेल्थ बिघडवू शकतात.

दातांसाठी बिस्कीटपेक्षा चॉकलेट जास्त हानिकारक कसे ? 

डेंटिस्टचे म्हणणे आहे की, चॉकलेट तोंडात लवकर विरघळते. विशेषतः साधे मिल्क चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट लाळेमुळे पटकन विरघळतात. डार्क चॉकलेटमध्ये काही नैसर्गिक संयुगे देखील असतात, जे जीवाणू कमी करण्यास मदत करू शकतात. तरीसुद्धा, बिस्किट आणि चॉकलेट हे दोन्ही दातांसाठी हानिकारक असतात, पण बिस्किट दातांना जास्त नुकसान पोहोचवू शकतात. 

महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करणारे ७ सुपरफूड्स! आहारतज्ज्ञांचा सल्ला, रोज १ तरी खा कारण...

झटपट वेटलॉससाठी करा काळीमिरीचा उपाय, चवीला तिखट पण काम जबरदस्त-दिसेल वजनात फरक काही दिवसात...

दातांचे आरोग्य जपण्यासाठी नेमकं काय करावं ? 

१. बिस्किट आणि चॉकलेट खाण्याचे प्रमाण कमी करा  किंवा योग्य प्रमाणातच खाणे फायदेशीर ठरेल. 

२. चॉकलेट किंवा बिस्किट खाल्ल्यानंतर तोंड पाण्याने धुवा किंवा ब्रश करा व खळखळून चूळ भरा. 

३. चॉकलेट खायचेच असेल तर डार्क चॉकलेट खा, ज्यात साखरेचे प्रमाण कमी असते.

४. अशा प्रकारच्या स्नॅक्ससोबत दूध आणि नट्स खा, ज्यामुळे त्यांचा हानिकारक प्रभाव कमी होऊ शकेल.

५. माऊथ वॉशचा वापर करा.

६. पुरेशा प्रमाणांत पाणी प्या.  

७. रोज किमान दोनदा ब्रश करा.


Web Title : चॉकलेट या बिस्किट: दांतों के लिए क्या है ज्यादा हानिकारक? डेंटिस्ट!

Web Summary : मशहूर डेंटिस्ट डॉ. रेवंत हिमात्सिंगका का कहना है कि चॉकलेट की तुलना में बिस्किट दांतों के लिए ज्यादा हानिकारक होते हैं। बिस्किट दांतों में ज्यादा देर तक चिपकते हैं, जिससे बैक्टीरिया और कैविटी को बढ़ावा मिलता है। डार्क चॉकलेट तेजी से घुल जाता है और इसमें जीवाणुरोधी यौगिक हो सकते हैं। दोनों का सेवन कम करें, स्वस्थ दांतों के लिए मौखिक स्वच्छता बनाए रखें।

Web Title : Chocolate or biscuit: Which is worse for teeth? Dentist reveals!

Web Summary : Biscuits are more harmful to teeth than chocolate, says celebrity dentist Dr. Revant Himatsingka. Biscuits stick to teeth longer, promoting bacteria and cavities. Dark chocolate dissolves faster and may have antibacterial compounds. Reduce intake of both, maintain oral hygiene for healthy teeth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.