Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटभर जेवण केलं तरी काहीतरी खावंसं वाटतं? हा आजार म्हणायचा की आजाराचं लक्षण

पोटभर जेवण केलं तरी काहीतरी खावंसं वाटतं? हा आजार म्हणायचा की आजाराचं लक्षण

Over Eating Problem: जर तुमच्यासोबतही असंच होत असेल, तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर हे काही सामान्य नाही. असं अनेक आजारांमुळेही होऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:25 IST2025-02-21T12:20:05+5:302025-02-21T16:25:32+5:30

Over Eating Problem: जर तुमच्यासोबतही असंच होत असेल, तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर हे काही सामान्य नाही. असं अनेक आजारांमुळेही होऊ शकतं.

Why felling hungry all the time increase in appetite | पोटभर जेवण केलं तरी काहीतरी खावंसं वाटतं? हा आजार म्हणायचा की आजाराचं लक्षण

पोटभर जेवण केलं तरी काहीतरी खावंसं वाटतं? हा आजार म्हणायचा की आजाराचं लक्षण

Over Eating Problem: आजकाल जास्तीत जास्त लोक ओव्हरईटिंगचे शिकार आहेत. खासकरून महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. खाणं हे तुमच्या फिजिकल वर्कवर अवलंबून असतं. निरोगी आणि फिट राहण्यासाठी संतुलित आहार घेणं महत्वाचं असतं. भूकेपेक्षा जास्त खाल तर शरीरात अनेक आजार घर करतात. तर काही लोक असेही असतात ज्यांना अधिक भूक लागते. या लोकांना जेवण केल्यावरही भूक लागते. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल, तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर हे काही सामान्य नाही. असं अनेक आजारांमुळेही होऊ शकतं. अशात जाणून घेऊ कोणत्या कारणांमुळे जास्त भूक लागते.

जास्त भूक लागणं आजार तर नाही ना?

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार पुन्हा पुन्हा भूक लागण्याला कमी झोप हे कारण असू शकतं. जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा भूकेचे संकेत देणारे घ्रेलिन हार्मोन्स भरपूर प्रमाणात वाढतात. अशा स्थितीत भूक लागते आणि पुन्हा पुन्हा खाण्याचं मन होतं. त्यामुळे रोज रात्री साधारणपणे ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

डायबिटीस

शुगर असलेल्या लोकांनाही भूक जास्त लागते. डायबिटीस झाल्यावर ग्लूकोज सेल्सपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यामुळे एनर्जी कायम ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. जास्त भूक लागल्यामुळं शुगर लेव्हल हाय होऊ लागते.

थायरॉइड

थायरॉइडची समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. थायरॉइड झाल्यावर काही महिलांना जास्त भूक लागते. अशा महिलांची पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. थायरॉइड हार्मोन वाढल्यावर हायपरथायरॉयडिज्म होतो. यात रूग्णाला पोट रिकामं वाटतं, ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.

प्रोटीनची कमतरता

ज्या लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते, अशा लोकांनाही प्रमाणापेक्षा जास्त भूक लागते. अशा लोकांना पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. प्रोटीनची कमतरता झाल्यावर असे हार्मोन कमी बनतात, ज्यामुळे आपल्या पोट भरलेलं असल्याची जाणीव होत असते. अशात जास्त भूक लागते.

स्ट्रेस आणि राग

रागात किंवा जास्त स्ट्रेस असल्यावरही काही लोकांना भूक जास्त लागते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा तुम्ही जास्त स्ट्रेस घेता तेव्हा शरीरात कार्टिसोल हार्मोन आणखी वाढतात. या हार्मोनचा थेट प्रभाव भूकेवर पडतो. त्यामुळे डिप्रेशन, एंझायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त भूक लागते.

Web Title: Why felling hungry all the time increase in appetite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.