तुळशीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधींव्यतिरिक्त तुळस अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या अंगणात, घरात तुळस लावल्याने अनेक फायदे मिळू शकतात. प्रसिद्ध एमडी (आयुर्वेद) डॉ. मनीषा मिश्रा यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चार जबरदस्त फायदे सांगितले आहेत. घरात तुळस लावणं तुमच्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं हे जाणून घेऊया....
हवा शुद्ध राहते
तुळस नॅचरल एअर प्यूरीफायर म्हणून काम करतं. एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्पष्ट केलं आहे की, त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे हवेतील हानिकारक बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्स काढून टाकतात. यामुळे घरातील हवा स्वच्छ आणि ताजी राहते. जर तुम्ही महानगरात किंवा प्रदूषित क्षेत्रात राहत असाल तर तुम्ही घरात नक्कीच तुळशीचं रोप लावा.
तणावापासून मुक्ती
तुळस मनाला शांत करते. डॉ. मनीषा मिश्रा स्पष्ट करतात की, तुळशीमध्ये काही अशी तत्व असतात जे कॉर्टिसोल हार्मोन (तणाव निर्माण करणारा) कमी करण्यास मदत करतात. हे मन शांत करण्यास, चिंता कमी करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत करतं. या कारणास्तव, तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा अभ्यासाच्या खोलीत तुळस ठेवण्याचा विचार करू शकता.
डास आणि कीटकांपासून संरक्षण
तुळशीमध्ये युजेनॉल सारखे नॅचरल कम्पाऊंड असतात, जे डास आणि माश्या दूर करतात. तुळशीचे रोप खिडकी किंवा दाराजवळ ठेवल्याने डासांना घरात प्रवेश करण्यापासून रोखता येतं. बरेच लोक तुळशीची पाने बारीक करून त्याचा नॅचरल स्प्रे बनवतात.
आरोग्यासाठी फायदेशीर
तुळशीची पानं केवळ हवा शुद्ध करण्यासाठी वापरली जात नाहीत. ती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत करतात. तुम्ही तुळशीच्या पानांपासून चहा, काढा बनवू शकता. ते सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम देतं. तुळशीतील अँटीऑक्सिडंट गुणधर्म मानसिक आरोग्य देखील सुधारतात.
घरात तुळशीचे रोप लावणे केवळ धार्मिकदृष्ट्या शुभ मानलं जात नाही, तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झालं आहे. ते तुमच्या घराचे वातावरण ताजेतवाने करते, तणाव कमी करते आणि आरोग्याची काळजी घेतं.