Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चहा पिण्याआधी नेहमी पाणी प्यावं असा सल्ला का दिला जातो? फायदे वाचून लावाल हीच सवय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:38 IST

Healthy Tips: चहा पिण्याआधी पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अशात जाणून घेऊ चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे फायदे काय होतात.

Healthy Tips: गरमा गरमा मसालेदार चहानं दिवसाची सुरूवात करणं अनेकांची सवय असते. चहाची अनेकांना सवय असते. तो प्यायल्याशिवाय कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, घरातील मोठे लोक चहा प्यायल्यावर पाणी न पिण्यास सांगतात. अनेदा तुम्ही हेही पाहिलं असेल की, सामान्यपणे जास्तीत जास्त लोक चहा पिण्याआधी पाणी पितात आणि नंतर चहा पितात. चहा प्यायल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. तर तेच चहा पिण्याआधी पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अशात जाणून घेऊ चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे फायदे काय होतात.

चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे फायदे

पाणी प्यायल्यानं शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होण्या मदत मिळते. चहामध्ये कॅफीन असतं जे शरीरातील पाणी कमी करतं. जर चहा पिण्याआधी चहा प्याल तर शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते. 

त्वचेसाठी फायदेशीर

चहा पिण्याआधी पाणी प्यायल्यानं त्वचेला आवश्यक हायड्रेशन मिळतं. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. तसेच त्वचा जास्त उजळते. जेव्हा तुम्ही चहा पिण्याआधी पाणी पित असाल तर शरीरात जमा टॉक्सिन बाहेर निघतात. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच पिंपल्सची समस्याही दूर होते.

पोटाचं आरोग्य चांगलं होतं

चहा पिण्याआधी पाणी प्यायल्यानं पोटाची सफाई होते. रात्रभर झोपल्यानंतर शरीरात अनेक विषारी तत्व जमा होतात. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा पोटातील हे जमा विषारी तत्व सजहपणे बाहेर जातात. चहा पाण्याआधी पाणी प्यायल्यास शरीराचं तापमानही कमी होतं.

मेंदू राहतो अॅक्टिव

पाणी शरीरात आत सगळीकडे पोहोचतं आणि मेंदुलाही हायड्रेट ठेवतं. सकाळी मेंदू आणि शरीराला जेव्हा सुस्ती वाटते तेव्हा पाणी प्यायल्यानं एनर्जी मिळते, ज्यामुळे मेंदू अ‍ॅक्टिव होतो. त्यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं आणि काम करण्याची क्षमताही वाढते. चहामधील कॅफीनमुळेही मेंदू अ‍ॅक्टिव राहतो.

किडनीसाठी फायदेशीर

पाणी प्यायल्यानं किडनीची काम करण्याची क्षमता वाढते आणि यानं शरीरात जमा विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत मिळते. चहामध्ये कॅफीन आणि इतर तत्व असतात. जे किडनीवर दबाव टाकतात. त्यामुळे चहा पिण्याआधी पाणी पिणं चांगलं असतं.

मूड चांगला होतो

पाणी प्यायल्यानं शरीरात हार्मोनचं संतुलन कायम राहतं आणि तणावही कमी होतो. चहा पिण्याआधी पाणी प्यायल्यानं शरीरात एनर्जी वाढते आणि मूड चांगला होतो. ज्यामुळे दिवसभर मूड चांगला राहतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य