Talking Fatigue Causes: सामान्यपणे सगळ्यांनाच असं वाटत असतं की, जे जास्त मेहनतीचं काम करतात, धावपळ करतात तेच लोक जास्त थकतात. पण कधी विचार केलाय का की, दिवसभर बोलल्याने, मीटिंग घेतल्याने, शिकवल्याने किंवा फोनवर बोलल्याने देखील थकवा येतो. कारण बोलणं ही एक अशी अॅक्टिविटी आहे, ज्यात मेंदू, नसा, श्वास, स्नायू आणि हार्मोन एकत्र काम करतात. अशात समजून घेऊ की, फार काही जड काम न करताही दिवसभर बोलून शरीर का थकतं आणि याची कारणं काय असतात.
दिवसभर बोलून शरीर का थकतं?
मेंदूवर सतत दबाव
बोलणं म्हणजे केवळ तोंडातून आवाज काढणं नाही. कारण जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपला मेंदू सतत काम करत असतो. काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, समोरची व्यक्ती काय प्रतिक्रिया देईल, योग्य शब्द कोणते वापरायचे, हे सगळं मेंदू सुरू असतं. खासकरून शिक्षक, कॉल सेंटर कर्मचारी, डॉक्टर, मॅनेजर्स या लोकांना दिवसभर विचार करून बोलावं लागतं. यात मेंदूची एनर्जी लवकर संपते. जेव्हा मेंदूची एनर्जी कमी होते, तेव्हा शरीरात थकवा जाणवतो.
श्वास घेण्याचा पॅटर्न बिघडतो
सतत काहीना काही बोलत राहिल्याने आपली श्वास घेण्याची नैसर्गिक प्रक्रिया प्रभावित होते. काही लोक बोलताना मोठा श्वास घेतात, तर काही लोक श्वास न घेताही बोलतात. काही लोकांना श्वास रोखण्यास समस्या होते. अशात श्वास घेण्याचं सगळं गणित बिघडतं. त्यामुळे शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे थेट थकवा, जडपणा आणि सुस्ती जाणवते. त्यामुळे सतत बोलल्यानंतर शरीर सैल पडू लागतं.
घसा आणि चेहऱ्याचे स्नायूही थकतात
आपण नेहमीच हे विसरतो की, बोलताना मसल्सही काम करतात. जसे की, घशाचे स्नायू, जबड्याचे स्नायू, जीभ आणि ओठ. दिवसभर बोलल्याने स्नायू सतत अॅक्टिव राहतात. ठीक त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पायांचे स्नायू थकतात. तसेच जास्त बोलल्याने व्हॉइस मसल्स थकतात. याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो.
भावनात्मक एनर्जीही खर्च होते
जर आपलं काम असं आहे ज्यात आपल्याला लोकांना समजावण्याचं काम असतं, तक्रारी ऐकून घ्यायच्या असतात, विनम्र रहावं लागतं, राग लपवावा लागतो. तर अशाने केवळ शारीरिकच नाही तर भावनात्मक थकवाही येतो. भावनांना कंट्रोल करण्यासाठी शरीराला खूप एनर्जी खर्च करावी लागते. हेच कारण आहे की, जास्त बोलणारे लोक सायंकाळपर्यंत फार डाऊन झालेले असतात.
स्ट्रेस हार्मोन वाढतात
सतत बोलणं, समजावणं यामुळे शरीरात कार्टिसोल हार्मोन वाढू शकतात. या हार्मोनने थोडा वेळ फोकस वाढतो, पण जर हे सतत जास्त वाढत राहिले तर थकवा वाढतो, स्नायूंमध्ये जडपणा वाढतो, डोकं दुखतं आणि कमजोरी जाणवते.
कसा घालवाल थकवा?
बोलताना अधून-मधून मोठा श्वास घ्या
दिवसभर पुरेसं पाणी प्या
कामातून काही मिनिटांसाठी ब्रेक घ्या
दिवसाच्या शेवटी ५ ते १० मिनिटं ध्यान करा
आवाजावर जास्त दबाव टाकू नका दिवसभर बोलल्यानंतर येणारा थकवा ही काही कल्पना नाही. ही एक वैज्ञानिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे. जेव्हा मेंदू, श्वास, स्नायू आणि भावना सगळ्या गोष्टी एकत्र काम करतात, तेव्हा शरीरात थकवा येणं स्वाभाविक आहे.
