बरेच लोक असे आहेत जे जेवणानंतर टॉयलेटमध्ये जातात. जेवण झाल्यानंतरच त्याचं पोट साफ होतं. लघवीसाठी जाणं सामान्य असलं तरी जेवणानंतर वारंवार संडासला जाणं योग्य नाही. ही स्थिती चिंताजनक असू शकते. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते असं झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. वारंवार होणारा हा त्रास टाळण्यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. (Why Do You Poop Right After Eating Us Gastroenterologist Dr Joseph Salhab Explains reason)
अमेरीकेच्या फ्लोरीडामधील गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ साल्हाब यांच्यामते जेवणानंतर टॉयलेटला जाणं गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्सचं कारण ठरू शकतं. ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया आहे. जी पोटात अन्न गेल्यानंतर सक्रीय होते. ज्यांना जेवल्यानंतर लगेच शौचास जावे लागते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतक्यात जे खाल्लंय ते सर्वच मलाद्वारे बाहेर आले. (Pooping After Eating)
मल शरीरात आधीच तयार झालेला असतो. जेवण पोटात गेल्यामुळे फक्त शारिरीक क्रिया वेगानं होतात. ज्या लोकांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, लॅक्टोज इनटॉलरेंस किंवा काही खाद्यपदार्थांपासून संवेदनशीलता असते. त्यांच्यात हे रिफ्लेक्स अधिक सक्रिय होऊ शकतात.
काही सामान्य ट्रिगर्स ही समस्या वाढवू शकतात. जसं की जास्त फॅट्सयुक्त अन्न खाणं, जास्त प्रमाणात खाणं, कॉफी किंवा कॅफेन, अत्याधिक थंड पेयांचे सेवन, मसालेदार अन्नपदार्थ खाणं, आर्टिफिशियल स्वीटनर्स, धूम्रपान, तणाव किंवा चिंता यांसारख्या क्रिया मलत्यागाची प्रक्रिया वेगानं करतात.
खासकरून ताण-तणावामुळे नर्व्हस सिस्टीमची सक्रियता वाढते त्यामुळे अचानक मल त्याग करण्याची इच्छा होते. अशा स्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. योग्य आहार, ताण-तणाव नियंत्रण, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करायला हवेत.
आहारात हे बदल करा
१) आहारात फायबर्सचे प्रमाण योग्य ठेवा. जर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असेल तर काही फायबर्सयुकक्त पदार्थ आहारात घेऊ शकता.
२) एकदम पोटभर न जेवता दिवसातून थोडे-थोडे करून ४ ते ५ वेळा जेवा. यामुळे पचनक्रियेवर अचानक ताण येत नाही.
३) रोजच्या जेवणात दही-ताण या पदार्थांचा समावेश करा. यात असलेले चांगले बॅक्टेरिया पचन सुधारण्यास मदत करतात.
Web Summary : Frequent post-meal toilet trips may signal gastrocolic reflex or underlying issues like IBS. Dr. Salhab advises monitoring triggers such as fatty foods, caffeine, and stress. Manage diet, include fiber and probiotics, and consult a doctor for persistent problems.
Web Summary : खाने के बाद बार-बार शौच जाना गैस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स या आईबीएस जैसी समस्याओं का संकेत हो सकता है। डॉ. साल्हाब वसायुक्त भोजन, कैफीन और तनाव जैसे कारणों पर नजर रखने की सलाह देते हैं। आहार का प्रबंधन करें, फाइबर और प्रोबायोटिक्स शामिल करें और लगातार समस्याओं के लिए डॉक्टर से परामर्श लें।