Why You Get Sleepy After Eating : थंडीच्या दिवसात थोडं जास्त आळस येणं स्वाभाविक आहे. खासकरून दुपारचं जेवण झाल्यानंतर अनेकांना कामावर फोकस करता येत नाही. जेवण होताच डोळ्यांमध्ये जडपणा, सुस्ती आणि झोप येऊ लागते. कधी कधी तर लोकांना हवं असूनही डोळे उघडे ठेवंणं कठीण होतं. यामुळे कामाचा वेग कमी होतो आणि फोकसही राहत नाही. जर तुम्हालाही ही समस्या नेहमीच होत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
प्रसिद्ध एमबीबीएस, एमडी डॉ. शालिनी सिंह सोलंकी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, या समस्येमागे आपल्या खाण्या–पिण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. त्या सवयी समजल्या तर सुस्तीवर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
जेवणानंतर झोप का येते?
जास्त कार्ब्स खाणे
डॉक्टर सांगतात की जेवणात जर चपाती, भात किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, तर शरीरातील इन्सुलिन लेव्हल अचानक वाढते. त्यामुळे थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते, पण नंतर लगेच ऊर्जा कमी होते. या ‘एनर्जी क्रॅश’मुळे खूप झोप येऊ लागते.
तळलेले व जास्त तेलकट पदार्थ
तेलकट व जड पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. अशावेळी शरीरातील बराचसा रक्तप्रवाह पोटाकडे वळतो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतं आणि सुस्ती व झोप येऊ लागते.
पुरेसं पाणी न पिणे
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर पचन स्लो होतं. अन्न पचायला वेळ लागतो आणि जडपणा जाणवतो. त्यामुळे झोप व आळस दोन्ही वाढतात.
अपुरी झोप
मागच्या रात्री नीट झोप झाली नसेल तर जेवणानंतर शरीर लगेच रिलॅक्स मोडमध्ये जातं आणि झोप अधिक वेगाने येते.
रक्ताची कमतरता किंवा थायरॉइड
वरील कारणांसोबतच जर प्रत्येक जेवणानंतर हलके जेवले तरी लगेच झोप येत असेल, तर त्यामागे अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता किंवा थायरॉइडची समस्या असू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
सुस्ती कशी दूर कराल?
नेहमी हलकं आणि संतुलित अन्न खा.
जास्त कार्ब्स, गोड आणि तळलेले पदार्थ टाळा.
जेवणानंतर 5–10 मिनिटं वॉक करा.
दिवसभर पुरेसे पाणी प्या.
रात्रीची झोप व्यवस्थित आणि पूर्ण घ्या.
समस्या रोज होत असेल तर आवश्यक हेल्थ चेकअप करून घ्या.
जेवणानंतर थोडी झोप येणं सामान्य आहे, पण ती जर दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागली तर खाण्याच्या सवयी सुधारायला आणि आवश्यकता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
