Thyroid Cancer : थायरॉइडसंबंधी समस्या आजकाल फारच कॉमन झाल्या आहेत. पण जेव्हा थायरॉइड कॅन्सरचा विषय येतो तेव्हा याची आकडेवारी धक्का देणारी ठरते. पुरूषांच्या तुलनेत महिलांना थायरॉइड कॅन्सर होण्याचा धोका जवळपास ३ ते ४ पटीने अधिक असतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे हा काही योगायोग नाही, यामागे महिलांची शारीरिक संरचना आणि हार्मोनल बदल मोठी भूमिका निभावतात. अशात महिलांमध्ये थायरॉइड कॅन्सरचा धोका अधिक का असतो, हे माहिती असणं फार गरजेचं आहे.
हार्मोन्सची भूमिका आणि एस्ट्रोजनचा प्रभाव
महिलांमध्ये थायरॉइड कॅन्सरचा धोका अधिक असण्यामागे हार्मोनचा मोठा हात असतो. आपल्या थायरॉइड ग्रंथि अॅस्ट्रोजन हार्मोनबाबत अधिक संवेदनशील असतात. महिलांच्या शरीरात खासकरून रिप्रोडक्टिव काळात अॅस्ट्रोजन पुरूषांच्या तुलनेत अधिक असतात. त्यामुळे हे थायरॉइड सेल्स स्टिमुलेट करू शकतात, ज्यामुळे सेल्सची वाढ असामान्यपणे होण्याचा धोका असतो, जो पुढे जाऊन कॅन्सरचं रूप घेतो.
हार्मोन्समधील बदल जबाबदार
महिलांच्या जीवनात हार्मोनमध्ये चढ-उतार फार जास्त होत असतात. टीएनएज, प्रेग्नेन्सी आणि मेनोपॉज दरम्यान शरीरात होणारे बदल थायरॉइडला थेट प्रभावित करू शकतात. त्याशिवाय ऑटोइम्यून थायरॉइड डिजीज, जसे की, हाशिमोटो थायरॉइडिटिस सुद्धा महिलांमध्ये अधिक आढळतो. या स्थितीमुळे थायरॉइडमध्ये होणारं क्रॉनिक इन्फ्लेमेशन कॅन्सरचा धोका वाढवतं.
लक्षणं ओळखणं गरजेचं
थायरॉइड कॅन्सरच्या वाढत्या केसेसमुळे चिंता वाढू शकते, पण यात एक चांगली बाब म्हणजे जर वेळीच याची माहिती मिळाली तर कॅन्सर पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. अशात याची काही लक्षणे दिसतात, ती खालीलप्रमाणे सांगता येतील.
- मानेमध्ये सूज किंवा गाठ - आवाजामध्ये अचानक बदल - अन्न-पाणी गिळण्यास त्रास
Web Summary : Women face a higher risk of thyroid cancer due to hormonal factors, particularly estrogen's influence. Fluctuations during reproductive years, pregnancy, and menopause, along with autoimmune diseases, further elevate the risk. Early detection of symptoms like neck swelling or voice changes is crucial for successful treatment.
Web Summary : हार्मोनल कारकों, विशेष रूप से एस्ट्रोजन के प्रभाव के कारण महिलाओं में थायरॉइड कैंसर का खतरा अधिक होता है। प्रजनन वर्षों, गर्भावस्था और रजोनिवृत्ति के दौरान उतार-चढ़ाव, ऑटोइम्यून बीमारियों के साथ, जोखिम को और बढ़ाते हैं। गर्दन में सूजन या आवाज में बदलाव जैसे लक्षणों का शीघ्र पता लगाना सफल उपचार के लिए महत्वपूर्ण है।