Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नेहमीच थकवा येतो- रोजची कामंही उरकत नाहीत? डॉक्टर सांगतात ३ कारणं आणि सोपे उपाय

नेहमीच थकवा येतो- रोजची कामंही उरकत नाहीत? डॉक्टर सांगतात ३ कारणं आणि सोपे उपाय

Health Tips For Every Woman: काही जणींना सतत थकवा येत असतो. असं का होतं ते पाहूया...(why do some women always feel tired and lazy?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 09:30 IST2025-07-31T09:21:19+5:302025-07-31T09:30:01+5:30

Health Tips For Every Woman: काही जणींना सतत थकवा येत असतो. असं का होतं ते पाहूया...(why do some women always feel tired and lazy?)

why do some women always feel tired and lazy? causes and reasons for constant fatigue  | नेहमीच थकवा येतो- रोजची कामंही उरकत नाहीत? डॉक्टर सांगतात ३ कारणं आणि सोपे उपाय

नेहमीच थकवा येतो- रोजची कामंही उरकत नाहीत? डॉक्टर सांगतात ३ कारणं आणि सोपे उपाय

Highlightsकाही महिलांना सतत थकवा का येत असावा यामागची काही कारणं ...

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की त्यांना खूप जास्त थकवा येतो. कधी तरी रोजच्यापेक्षा जास्त काम झालं, प्रवास झाला, धावपळ झाली तर थकवा येणं समजण्यासारखं आहे. पण काही जणी मात्र सतत थकलेल्याच दिसतात. त्यांना कायम खूप आळस आलेला असतो. रात्री ७ ते ८ तासांची पुर्ण झोप होऊनही सकाळी अजिबात उठावं वाटत नाही. सगळा दिवस आळसामध्येच निघून जातो. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर ते अजिबात हलक्यात घेऊ नका (Health Tips For Every Woman). असं का होतं आणि त्यासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे ते पाहा...(why do some women always feel tired and lazy? )

 

काही महिलांना सतत थकवा का येतो?

काही महिलांना सतत थकवा का येत असावा यामागची काही कारणं डॉक्टरांनी ughad.ughad या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहेत. ती कारणं नेमकी कोणती ते पाहूया..

१. ज्या महिलांचे नुकतेच बाळंतपण झाले आहे आणि त्यांचं ब्रेस्ट फिडिंग सुरू आहे, त्यांना शरीरात झालेल्या बाळंतपणाच्या मोठ्या बदलामुळेही थकवा येऊ शकतो. 

भरपूर पुडं असणारी घडीची मऊसूत पोळी करायची आहे, ३ गाेष्टी फक्त करा! परफेक्ट पोळी जमणारच..

२. बाळंतपण, ब्रेस्ट फिडिंग यानंतर महिलांच्या शरीरातील लोह बरेचदा कमी होतं. लोह कमी झालं की हिमाेग्लोबिन कमी होतं. ऑक्सिजन सर्व शरीरापर्यंत पोहोचवणे हे काम हिमोग्लोबिनचं असतं. तेच कमी झालं तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे मग थकवा येतो. यालाच ॲनिमिया असंही आपण म्हणतो.

 

३. व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळेही अनेक महिलांना थकवा येतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो आहार घेऊन या दोन्ही व्हिटॅमिन्सच्या सप्लिमेंट्स लवकरात लवकर सुरू कराव्या.

घरकाम करून हात खरखरीत झाले- काळवंडून गेले? फक्त १० मिनिटांचा उपाय- हात होतील मऊ

४. डॉक्टर असंही सांगतात की बऱ्याचदा महिलांना येणारा थकवा महिलांच्या मानसिक आरोग्याशीही निगडीत असू शकतो. त्यामुळे ताण घेऊ नका. मन शांत राहील यासाठी काही व्यायाम, प्राणायाम करा. मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरी शारिरीक थकवा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. 


 

Web Title: why do some women always feel tired and lazy? causes and reasons for constant fatigue 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.