Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा धोका, पाहा याची कारणं आणि कुणाला असतो जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:18 IST

Kidney Stone In Summer : उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका अधिक वाढतो. पण या दिवसात ही समस्या का वाढते आणि कुणाला याचा जास्त धोका असतो हे पाहुयात.

Kidney Stone In Summer : उन्हाळा आला की केवळ घामाच्या धारा, थकवा आणि कमजोरी याच समस्या होतात असं नाही. या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा देखील सामना करावा लागतो. कडक उन्हात बाहेर पडल्यावर वेगाने शरीरातील पाणी कमी होऊ लागतं. ज्याकडे आपण सामान्य डिहायड्रेशन म्हणून दुर्लक्ष करतो. पण ही छोटीशी चूक पुढे जाऊन किडनी स्टोनची गंभीर समस्या बनू शकते. अशात समजून घेऊया की, उन्हाळ्यात किडनी स्टोनची समस्या का वाढते आणि यापासून कसा बचाव करावा.

उन्हाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा धोका   जसजसं तापमान वाढतं, शरीर स्वत:ला थंड ठेवण्यासाठी जास्त घाम काढतो. जर यादरम्यान योग्य प्रमाणात पाणी प्यायलं गेलं नाही तर शरीरात अनेक बदल व्हायला सुरूवात होते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. हेच कारण आहे की, उन्हाळ्यात किडनी स्टोनच्या केसेस वाढलेल्या बघायला मिळतात.

मुळात उन्हाळ्यात शरीर सतत आपलं तापमान नियंत्रित करू लागतं आणि यासाठी घाम येणं ही एक गरजेची प्रक्रिया आहे. पण जेव्हा घामाच्या माध्यमातून शरीरातून पाणी निघतं आणि त्याची भरपाई केली जात नाही, तेव्हा किडनीकडे फिल्टर करण्यासाठी योग्य प्रमाणात द्रव्य शिल्लक राहत नाही. यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं. लघवी घट्ट होते. सोबतच यात कॅल्शिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अॅसिडसारखे तत्व जमा होऊ लागतात. हेच तत्व हळूहळू स्टोनचं रूप घेतात.

कुणाला जास्त धोका?

किडनी स्टोनचा जास्त धोका जे लोक पाणी कमी पितात त्यांना असतो. त्यासोबतच ज्यांना आधी स्टोन झाला आहे किंवा कुटुंबात कुणाला किडनी स्टोन झाला असेल तेव्हाही धोका असतो. तसेच जास्त मीठ खात असतील, जास्त नॉन-व्हेज खात असतील आणि ऑक्सालेट असलेले पदार्थ खातात त्यांनाही किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.. सोबतच लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा पुन्हा पुन्हा यूरिनरी ट्रॅक्स इन्फेक्शन होत असेल.

बचावाचे उपाय

किडनी स्टोनपासून बचावासाठी रोज ३ ते ४ लीटर पाणी प्या. लघवीच्या रंगाचे लक्ष द्या. जास्त मीठ असलेले आणि तळलेले - भाजलेले पदार्थ कमी खावे, जास्त प्रोटीन आणि ऑक्सालेट असलेले पदार्थ टाळावे. सायट्रेटयुक्त फळं जसे की, लिंबू आणि संत्री खावीत. जास्त तापमानात व्यायाम करणेही टाळावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Summer Heat Raises Kidney Stone Risk: Causes and Who's at Risk

Web Summary : Summer's heat causes dehydration, increasing kidney stone risk. Insufficient water intake leads to concentrated urine, fostering stone formation. Those drinking less water, with family history, high salt intake, or obesity are more vulnerable. Drink 3-4 liters of water daily, limit salt, and consume citrate-rich fruits to prevent it.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य