जेव्हा तुम्ही दुकानात दूध खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या रंगांच्या निळा, हिरवा, नारंगी रंगाच्या दुधाच्या पिशव्या दिसत असतील. पहिल्यांदा पाहिल्यानंतर हे रंग फक्त पॅकेजिंगचा एक भाग असतील असं वाटतं पण या रंगांमध्ये बरीच माहिती दडलेली असते. दुधाच्या पॅकेजिंगवरून दुधाचा दर्जाही समजत असतो. या रंगांच्या मागचं कारण आणि योग्य लॉजिक समजून घेऊ. (Why Do Milk Packets In India Are Blue, Green And Orange Colors Which Milk Is Perfect For You)
1) निळा रंग (टोन्ड मिल्क - Toned Milk)
बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या पिशव्यांवर निळा रंग असतो. याला 'टोन्ड मिल्क' म्हणतात. यामध्ये फॅटचे प्रमाण साधारणपणे ३% असते. गाईच्या दुधात पाणी आणि 'स्किम्ड मिल्क पावडर' मिसळून हे दूध तयार केले जाते. ज्यांना वजन नियंत्रित ठेवायचे आहे किंवा ज्यांना जास्त फॅट असलेले दूध पचत नाही, त्यांच्यासाठी हे दूध उत्तम आहे. चहा, कॉफी किंवा रोजच्या वापरासाठी हे अत्यंत उपयुक्त मानले जाते.
2) नारंगी रंग (फुल क्रीम मिल्क - Full Cream Milk)
नारंगी रंगाच्या पिशवीत 'फुल क्रीम' दूध असते. यामध्ये फॅटचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६% किंवा त्यापेक्षा जास्त असते. हे दूध अत्यंत घट्ट आणि पौष्टिक असते. वाढत्या वयाच्या मुलांसाठी, खेळाडूंसाठी किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी हे दूध फायदेशीर ठरते. या दुधापासून बनवलेले दही, बासुंदी किंवा खीर अतिशय चविष्ट लागते.
3) हिरवा रंग (स्टँडर्डाइज्ड मिल्क - Standardized Milk)
हिरव्या रंगाच्या पिशवीत 'स्टँडर्डाइज्ड' दूध असते. यामध्ये फॅटचे प्रमाण साधारण ४.५% असते. हे दूध निळ्या आणि नारंगी रंगाच्या पिशवीतील दुधाचा 'मध्यम मार्ग' आहे. हे ना जास्त पातळ असते ना जास्त घट्ट. मध्यम वयोगटातील व्यक्तींसाठी आणि ज्यांना संतुलित आहार हवा आहे, त्यांच्यासाठी हिरव्या पिशवीतील दूध हा एक चांगला पर्याय आहे.
तुमच्यासाठी कोणते दूध योग्य?
दूध निवडताना तुमचे वय आणि शारीरिक गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, तर निळ्या पिशवीतील (टोन्ड) दूध निवडावे. जर घरात लहान मुले असतील, तर त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी नारंगी पिशवीतील (फुल क्रीम) दूध देणे योग्य ठरते.
Web Summary : Milk packet colors signify fat content. Blue (toned) is low-fat, good for weight management. Orange (full cream) is high-fat, ideal for children. Green (standardized) offers a balanced option for adults. Choose based on age and health needs.
Web Summary : दूध के पैकेट के रंग वसा की मात्रा दर्शाते हैं। नीला (टोन्ड) कम वसा वाला, वजन प्रबंधन के लिए अच्छा है। नारंगी (फुल क्रीम) उच्च वसा वाला, बच्चों के लिए आदर्श है। हरा (मानकीकृत) वयस्कों के लिए एक संतुलित विकल्प प्रदान करता है। अपनी उम्र और स्वास्थ्य आवश्यकताओं के आधार पर चुनें।