Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रात्री ३ वाजता गाढ झोपेतून अचानक जाग येते, झोपमोड होते? असं होणं गंभीर की नॉर्मल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:23 IST

Sleep Problem : जगभरात अनेक लोकांना हा अनुभव येतो. अनेकजण याला भुताटकी किंवा पॅरानॉर्मल गोष्टींशी जोडतात, पण खरं कारण विज्ञानाशी संबंधित आहे.

Sleep Problem : रात्री लवकर आणि चांगली झोप लागणं ही अनेकांमध्ये बघायला मिळणारी समस्या आहे. यासाठी लोक औषधं किंवा गोळ्याही घेतात. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर सुस्ती राहते, आळस येतो आणि स्ट्रेसही वाढतो. झोपेसंबंधी हा एक मुद्दा झाला. काही लोकांसोबत असंही होतं की, रात्री अचानक ३ वाजता त्यांना जाग येते. आपल्यासोबतही असं होत असेल. पण ही काही चिंतेची बाब नाही. असं होणं नॉर्मल आहे. जगभरात अनेक लोकांना हा अनुभव येतो. अनेकजण याला भुताटकी किंवा पॅरानॉर्मल गोष्टींशी जोडतात, पण खरं कारण विज्ञानाशी संबंधित आहे. रात्री ३ वाजता अचानक जाग येण्यामागे एक केमिकल कारणीभूत असतं. ज्याबाबत डॉ. आमिर खान यांनी माहिती दिली. 

कोर्टिसोल हार्मोन्सची भूमिका

आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला सर्केडिअन रिदम म्हणतात. हेच आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा नियंत्रित करतं. या प्रक्रियेत कोर्टिसोल या हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते. याला “स्ट्रेस हार्मोन” असंही म्हणतात. सकाळी कोर्टिसोल जास्त असतं. त्यामुळे आपण जागे आणि अलर्ट असतो. रात्री कोर्टिसोल कमी होतं, ज्यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि झोप लागते.

रात्री ३–४ वाजता काय होतं?

साधारणपणे, पहाटे ३–४ वाजता कोर्टिसोल पुन्हा हळूहळू वाढायला सुरुवात करतं. ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे जी तुम्हाला उठण्यासाठी तयार करते. पण जर तुम्ही दिवसभर तणावात असाल आणि कोर्टिसोल आधीच जास्त असेल तर रात्री ते जास्त प्रमाणात वाढतं आणि तुमची झोप अचानक उघडते.

“फाइट किंवा फ्लाइट” मोड

स्ट्रेसमुळे शरीर फाइट किंवा फ्लाइट मोडमध्ये जातं. त्यामुळे गाढ झोप लागत नाही. मेंदू सतत अलर्ट राहतो. छोटीशी हालचाल झाली तरी झोपमोड होते. 

इतर कारणं

रात्री उशिरापर्यंत मोबाईल/लॅपटॉप वापरणे, कॅफीन (कॉफी/चहा) आणि अनियमित झोपेची सवय या गोष्टींमुळे कोर्टिसोलचा बॅलन्स बिघडतो आणि याचा झोपेवर परिणाम होतो.  

कोर्टिसोल कंट्रोल कसे कराल?

कोर्टिसोल पूर्णपणे वाईट नाही ते शरीराला अलर्ट ठेवतात. पण जर कोर्टिसोलची लेव्हल सतत जास्त राहिली, तर झोप, वजन, मूड आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे त्याला बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं. यासाठी रोज पुरेशी झोप घ्या, रोज झोपण्याची एक वेळ फिक्स ठेवा, मेडिटेशन, योगा करा, संध्याकाळनंतर कॉफी/चहा टाळा. कॅफीन कोर्टिसोल वाढवतात आणि झोप बिघडते. झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल/लॅपटॉप टाळा यामुळे हार्मोन सायकल सुधारते.

English
हिंदी सारांश
Web Title : Waking up at 3 AM? Understanding the Science Behind Sleep Disruption

Web Summary : Sudden awakenings at 3 AM are often linked to cortisol levels and stress. Maintaining a consistent sleep schedule, managing stress through yoga/meditation, and avoiding late-night caffeine/screen time can help regulate sleep cycles.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स