दुपारच्या वेळी भरपेट जेवण झालं, ताटात छान मऊ भात आणि गरमागरम चपाती. जेवण संपतं न संपतं तोच डोळ्यांवर झोप येऊ लागते. असं तुमच्यासोबतही होत का? मग ऑफिसमध्ये असो किंवा घरी, बसल्या जागी आपल्याला डुलकी लागते.(Sleepiness after lunch) आपण याला आळस म्हणतो आणि स्वत:लाच मात्र दोष देत राहतो. पण जेवल्यानंतर येणारी झोप ही आळसाचं लक्षण नसून शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.(Feeling sleepy after eating) आपल्या शरीरात जेवणानंतर काही हार्मोनल आणि जैविक बदल घडतात, ज्यामुळे सुस्ती किंवा झोप येते. (Post lunch drowsiness)
डॉक्टर म्हणतात जेवल्यानंतर आपले डोळे लगेच जड होतात. याला आपण अनेकदा आळस किंवा काम टाळण्याची सवय म्हणतो. पण खरेतर हे शरीराचे नैसर्गिक कार्य आहे. ही स्थिती कोणत्याही आजाराचे लक्षण नाही पण काही चुका केल्या तर आपल्या आरोग्यावर त्याचा नक्कीच चुकीचा परिणाम होतो.
जेवल्यानंतर शरीराची पचनक्रिया होणं सगळ्यात जास्त महत्त्वाच आहे. आपण जेवल्यानंतर पोट आणि आतड्यांना अन्न पचवण्यासाठी जास्त ऊर्जा आणि रक्ताची आवश्यकता असते. यामुळे मेंदूला होणारा ऊर्जेचा पुरवठा तात्पुरता कमी होतो. ज्यामुळे आळस आणि झोप येते.
दुपारी जेवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाच असतं ते म्हणजे सॅर्केडियन लय. दिवसभर शरीराची ऊर्जा पातळी बदलते. दुपारी जेवल्यानंतर आपल्याला २ ते ४ या वेळेस झोप येते कारण शरीराची ऊर्जा यावेळी कमी होते. दुपारच्या जेवणात तळलेले, साखरयुक्त किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेमध्ये वेगाने बदल होतात. यामुळे ऊर्जा कमी होते. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यास आळस आणि थकवा वाढतो.
आपण रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर शरीरात बदल होतात. बराच वेळ एका ठिकाणी बसणं, शारीरिक हालचालींचा अभाव ही देखील समस्या ठरते. जीवनशैलीत बदल करण्यासाठी आपल्याला आहारात प्रथिने, फायबर, हिरव्या भाज्या आणि हलका आहार घ्यायला हवा. जड जेवण करणं टाळा. जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी ५ ते १० मिनिटे चाला. यामुळे पचन सुधारेल आणि झोपेची तंद्री कमी होईल.
दिवसभर भरपूर पाणी प्या. रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. जर जास्त झोप येणे, अशक्तपणा किंवा थकवा येत असेल आरोग्याचे इतर समस्या देखील असू शकतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
