Join us

रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:42 IST

Swell In Eyes After Crying  : रडल्यानंतर डोळे लाल होतात आणि आजूबाजूला सूज येते. पण असं होण्यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण पाहणार आहोत.

Swell In Eyes After Crying  : रडणं ही एक नैसर्गिक भावना आहे. अनेकदा दु:खं झाल्यावर किंवा आनंदात रडायला येतं. अनेकदा तर रडून मन हलकं होतं. जास्त स्ट्रेस किंवा हार्मोन्समध्ये असंतुलन झालं तर डोळ्यातून पाणी येतं. आपल्यालाही अनेकदा रडू आलं असेल किंवा रडले असाल. तेव्हा एक गोष्टी नोटीस केलीये का की, रडल्यानंतर डोळे लाल होतात आणि आजूबाजूला सूज येते. पण असं होण्यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण पाहणार आहोत.

अश्रूंमध्ये काय असतं?

आपल्या कदाचित माहीत नसेल पण अश्रू केवळ पाणी नसतात. त्यात मीठ, प्रोटीन आणि हार्मोन्स असतात. जेव्हा आपल्याला जास्त रडू येतं तेव्हा जास्त ग्रंथी सक्रिय होऊ लागतात. ज्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा पसरट होते.

सूज येण्याचं कारण

रडल्यानंतर डोळे सुजतात. याचं कारण अश्रूंमधील मीठ असतं. या मिठानं खालच्या कोशिकांचं पाणी शोषूण घेतलं जातं. या प्रक्रियेला सायन्सच्या भाषेत ऑस्मोसिस म्हटलं जातं. 

चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये सूज

डोळ्यांवर जास्त दबाव पडल्यानं चेहऱ्याचे स्नायू प्रभावित होतात. त्याशिवाय आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्कुलेशन वाढतं. त्यामुळे चेहरा अधिक लाल दिसतो आणि डोळेही लाल दिसू लागतात.

रडल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया

रडल्यानंतर मन हलकं होतं. पण जास्त रडल्यानं शरीराच्या खासकरून वरच्या भाग जास्त जडपणा जाणवतो. नाकही वाहतं, कारण अश्रू नाकाशी कनेक्टेड मार्गातून वाहू लागतात. ज्यामुळे चेहरा आणि डोळ्यांच्या आजूबाजूचा दबाव वाढतो. यानं सूज येते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सइंटरेस्टींग फॅक्ट्स