Black Lines On Nails: आपण अनेकदा पाहिलं असेल की, अनेक लोकांच्या नखांवर काळसर रंगाची एक रेष दिसून येते. पण या याकडे सामान्यपणे दुर्लक्ष केलं जातं. पण आपल्या मनात कधी प्रश्न पडलाय का की, नखांवर ही रेष का दिसते किंवा ती येण्यामागचं काय कारण असावं? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर तिच्या हाताच्या अंगठ्याचा आणि पायाच्या मोठ्या बोटाचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये नखांवर हलक्या काळ्या रेषा स्पष्टपणे दिसत होत्या. तिने हा फोटो “mildly interesting” म्हणजेच थोडासा गंमतीशीर वाटला म्हणून पोस्ट केला होता. मात्र, युजर्सनी तिला लगेच इशारा दिला की हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो आणि तिने तात्काळ डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी.
महिलेने r/mildlyinteresting या सबरेडिटवर फोटो शेअर करत लिहिलं होतं की, “These black lines on my thumb and my toe.” म्हणजेच माझ्या अंगठ्यावर आणि पायाच्या बोटावर असलेल्या या काळ्या रेषा.
महिलेने हा फोटो काही मेडिकल मदतीसाठी टाकलेला नव्हता. तरीही कमेंट्समध्ये लोकांनी प्रतिक्रिया दिली. एका युजरने लिहिले की, अशा प्रकारच्या बहुतेक केसेसमध्ये मेलानोमा आढळतो. तसं नसेलही, पण लगेच डॉक्टरांना दाखवा. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकतं.
नखांवर काळी रेषा दिसण्याचा अर्थ काय?
Healthline नुसार, नखांवर दिसणाऱ्या काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या रेषेला मेलानोनीकिया असे म्हणतात. ही समस्या नखांना झालेली दुखापत, पोषणतत्त्वांची कमतरता, काही औषधांचा दुष्परिणाम यामुळे उद्भवू शकते. लंडन डर्मेटोलॉजी सेंटरच्या मते, गडद रंगाच्या त्वचेच्या लोकांमध्ये ही स्थिती अधिक आढळते.
मात्र Healthline असा इशारा देतो की, जर ही काळी रेषा फक्त एका नखावरच दिसत असेल, तर ती सबंगुअल मेलानोमा म्हणजेच नखाखाली होणारा स्किन कॅन्सर असू शकते.
आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?
यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, मेलानोमाचे मुख्य कारण UV किरणं असले तरी, नखाखाली होणारा मेलानोमा सूर्यप्रकाशाशी थेट संबंधित नसतो. मात्र, लवकर तपासणी केल्यास उपचार सोपे आणि प्रभावी ठरतात. त्या महिलेने प्रत्यक्षात तपासणी करून घेतली की नाही, हे स्पष्ट नाही. पण एवढं नक्की की, छोटीशी वाटणारी ही समस्या दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.
Web Summary : Black lines on nails can indicate various issues, from injuries to nutritional deficiencies. A dark line on a single nail might signal subungual melanoma, a skin cancer. Early detection is crucial for effective treatment; consult a doctor.
Web Summary : नाखूनों पर काली रेखाएँ चोटों से लेकर पोषण की कमी तक, कई समस्याओं का संकेत दे सकती हैं। एक नाखून पर एक गहरी रेखा सबंगुअल मेलानोमा, एक त्वचा कैंसर का संकेत हो सकता है। प्रभावी उपचार के लिए शीघ्र पता लगाना महत्वपूर्ण है; डॉक्टर से सलाह लें।