Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा...

कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा...

who should not eat raw onion : how much raw onion is safe to eat : how much raw onion should you eat per day : कच्चा कांदा खावा की खाऊ नये? 'या' लोकांसाठी कांदा ठरू शकतो अत्यंत घातक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2026 19:51 IST2026-03-14T14:02:09+5:302026-03-15T19:51:19+5:30

who should not eat raw onion : how much raw onion is safe to eat : how much raw onion should you eat per day : कच्चा कांदा खावा की खाऊ नये? 'या' लोकांसाठी कांदा ठरू शकतो अत्यंत घातक...

who should not eat raw onion how much raw onion is safe to eat how much raw onion should you eat per day | कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा...

कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा...

भारतीय जेवणामध्ये कच्चा कांदा अनेक पदार्थांसोबत आवर्जून खाल्ला जातोच. जेवणाच्या थाळीत कोणतेही पदार्थ असू दे पण बऱ्याचजणांना जेवताना कच्चा  कांदा लागतोच. भाजी, पोळी किंवा डाळ-भातासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने जेवणाची चव अधिक वाढते, असे अनेकांना वाटते. शिवाय कच्च्या कांद्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटकही आढळतात. मात्र रोजच्या जेवणासोबत कच्चा कांदा खाणे सर्वांसाठी योग्य असतेच असे नाही. काही लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो, तर काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी कच्चा कांदा खाणे टाळणे अधिक योग्य ठरू शकते. त्यामुळे रोजच्या आहारात कच्चा कांदा खावा की खाऊ नये आणि कोणत्या परिस्थितीत तो टाळावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते(who should not eat raw onion).

कच्चा कांदा खाण्याचे फायदे आणि कोणत्या लोकांनी तो खाणे टाळावे. प्रत्येक व्यक्तीसाठी कच्चा कांदा फायदेशीर नसतो. काही विशिष्ट शारीरिक समस्या असल्यास कच्चा कांदा खाणे (how much raw onion is safe to eat) तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. नक्की कोणी कांदा खावा आणि कोणी टाळावा? ते पाहूयात... 

जेवताना कोणी कच्चा कांदा खावा आणि कोणी टाळावा ?

'WebMD' नुसार, एक कप चिरलेल्या कच्च्या कांद्यामध्ये सुमारे ६४ कॅलरीज आणि ३ ग्रॅम फायबर असते. हा व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन बी६ (Vitamin B6), पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे, जो संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

'Healthline' मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, कांद्यामध्ये 'क्वेर्सेटिन' आणि सल्फर संयुगे असतात, ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे घटक एलडीएल (LDL - बॅड कोलेस्टेरॉल) कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि दीर्घकाळासाठी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

कांद्यामध्ये असलेले प्री-बायोटिक फायबर पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात. नियमितपणे थोड्या प्रमाणात कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. 'Healthline' मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार कांदा आणि लसूण यांसारख्या 'एलियम'  वर्गातील भाज्यांचा आहारात समावेश केल्यास पोटाचा आणि कोलोरेक्टल कर्करोगासोबतच काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो( how much raw onion should you eat per day).

वाळवण स्पेशल : तांदळाच्या पिठाचे पळी पापड! न लाटता पापड करण्याची रेसिपी, तेलात फुलतील दुप्पट... 

कच्चा कांदा कुणी खाऊ नये ?

बहुतेक निरोगी प्रौढांसाठी कोशिंबीर किंवा चटणीच्या स्वरूपात थोड्या प्रमाणात कच्चा कांदा खाणे चव आणि पोषण वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे. मात्र, आहारतज्ज्ञांच्या मते, व्यक्तीच्या पोटाचे आरोग्य आणि विशिष्ट शारीरिक स्थितीनुसार कांदा फायदेशीर ठरण्याऐवजी त्रासदायक ठरू शकतो.

१. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) किंवा संवेदनशील पचनसंस्था :- 'WebMD' नुसार, ज्यांना 'IBS' चा त्रास आहे किंवा ज्यांची पचनसंस्था अतिशय संवेदनशील आहे, त्यांनी कच्चा कांदा खाल्ल्यास त्यातील 'फ्रुक्टन' (Fructan) मुळे पोटात गॅस होणे, पोट फुगणे (Bloating), पोटात पेटके येणे किंवा जुलाब होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

२. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD) आणि पित्ताचा त्रास :- 'Georestrictions' च्या मते, ज्यांना 'GERD' हा आजार आहे किंवा ज्यांना वारंवार छातीत जळजळ होते, त्यांच्यासाठी कच्चा कांदा 'ॲसिड इरिटेशन' वाढवतो. यामुळे छातीत जळजळ होणे किंवा आंबट ढेकर येणे यांसारख्या तक्रारी अधिक वाढू शकतात.

३. मायग्रेनचा त्रास :- ज्यांना मायग्रेनची समस्या आहे, त्यांच्यासाठी कांद्यामध्ये असलेले 'टायरामाइन' (Tyramine) सारखे घटक संवेदनशील ठरू शकतात आणि डोकेदुखी वाढवू शकतात.

४. कांद्याची ॲलर्जी :- ज्यांना कांद्याची ॲलर्जी आहे, त्यांना खाज सुटणे, रॅशेस येणे, ओठ किंवा जिभेला सूज येणे, डोळ्यातून पाणी येणे, नाकात अडथळा जाणवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा लोकांनी विशेषतः कच्चा कांदा खाऊ नये. जर तुम्हाला पचनाशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या नसेल, तर दुपारच्या जेवणात सॅलॅड म्हणून कच्चा कांदा खाणे हा एक उत्तम पर्याय आहे.

गॅस संपला तरी टेंशन नाही! गॅसपेक्षाही स्वस्त पडेल 'या' इलेक्ट्रिक कुकरमधील स्वयंपाक - पाहा कोणता प्रेशर कुकर आहे बेस्ट? 

एका दिवसात किती कच्चा कांदा खाणे सुरक्षित आहे?

WebMD च्या मते, आहारात नियमितपणे कांद्याचा समावेश करणे (मग तो शिजवलेला असो वा कच्चा) हृदय आणि चयापचय क्रियेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. परंतु कच्चा कांदा खाण्याचं प्रमाण हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकते. ज्या लोकांना पचन किंवा रिफ्लक्सची कोणतीही समस्या नाही, त्यांच्यासाठी दिवसातून १ किंवा २ वेळा जेवणासोबत एक छोटी काकडी - कांद्याचं सॅलॅड ( किंवा दोन मोठे चमचे चिरलेला कच्चा कांदा) खाणे सामान्यतः योग्य मानले जाते. जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित असेल, तर दररोज थोड्या प्रमाणात कांदा खाण आरोग्यासाठी चांगले आहे.

Web Title : कच्चा प्याज: वरदान या अभिशाप? किसे खाना चाहिए, किसे बचना चाहिए?

Web Summary : कच्चे प्याज में विटामिन और एंटीऑक्सीडेंट होते हैं, जो हृदय स्वास्थ्य और पाचन के लिए फायदेमंद हैं। हालांकि, IBS, GERD, माइग्रेन या प्याज से एलर्जी वाले लोगों को इससे बचना चाहिए। अधिकांश के लिए संयम महत्वपूर्ण है।

Web Title : Raw Onion: Boon or Bane? Who Should Eat, Who Should Avoid?

Web Summary : Raw onions offer vitamins and antioxidants, benefiting heart health and digestion. However, those with IBS, GERD, migraines, or onion allergies should avoid them. Moderation is key for most.