Join us

कच्चा कांदा खाण्याची सवय 'या' लोकांना पडेल महागात! कच्चा कांदा आरोग्यासाठी चांगला, पण कुणी खाऊ नये पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 13:07 IST

Who Should Not Consume Raw Onion According To Ayurveda : Who should not Eat Onion : Here Is Why You Should Not Eat Raw Onions : कच्चा कांदा खाल्ला तर त्रास वाढू शकतो यासाठीच, कच्चा कांदा खाणे कुणी टाळावे ते पाहा...

'कांदा' हा भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक असा पदार्थ आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना जेवताना कच्चा कांदा चिरून तो तोंडी लावायला घेण्याची ( Who should not Eat Onion) सवय असतेच. याचबरोबर, काही अमुक एक पदार्थ असतील त्यासोबत तोंडी लावायला म्हणून कच्चा कांदा हमखास दिला जातो. उन्हाळ्यात बरेचजण कच्चे कांदे (Who Should Not Consume Raw Onion According To Ayurveda) जास्त प्रमाणात खातात. कच्चा कांदा शरीराला थंडावा देणारा असतो, म्हणून उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीर थंड राहते(Here Is Why You Should Not Eat Raw Onions).

जेवणासोबत कच्चा कांदा, लिंबू खाण्याने जेवणाची चव निश्चितच द्विगुणित होते. याशिवाय, कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरीही, कच्चा कांदा सगळ्यांनाच खाणे फायदेशीर ठरते असे नाही. आपल्यापैकी बऱ्याचजणांना जेवताना कच्चा कांदा खाण्याची सवय असते, परंतु जर काही मोजक्या शारीरिक समस्या असतील तर कच्चा कांदा खाणे टाळावे. कच्चा कांदा खाणे कोणी टाळावे ते पाहूयात. 

कच्चा कांदा कोणी खाऊ नये ?

१. सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर :- ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी कच्चा कांदा खाऊ नये. कारण, अशा परिस्थितीत कांदा खाल्ल्याने शरीरात कफ वाढू शकतो. यामुळे समस्या आणखी वाढू शकते. ज्या लोकांना नेहमी सर्दी - खोकल्याचा त्रास असतो त्यांनी कच्चा कांदा खाणे टाळावे. 

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

२. त्वचेची ऍलर्जी असेल तर :-  ज्या लोकांना त्वचेची ऍलर्जी आहे त्यांनी कच्चा कांदा खाऊ नये. कारण, त्यात असे संयुगे आढळतात, जे त्वचेच्या समस्या वाढवू शकतात. त्यामुळे, त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येत, कच्चा कांदा खाण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळीत पोट खूप जास्त दुखते ? करा १ सोपं आसन - पोटदुखी थांबून मिळेल आराम...

३. पचनाशी संबंधित समस्या असणे :- ज्यांना पचनाच्या समस्या असतील त्यांनी कच्चा कांदा खाऊ नये. कारण, अशा परिस्थितीत कांदा खाल्ल्याने पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्ही कच्चा कांदे खाणे टाळावे. 

४. थंड पदार्थांची ऍलर्जी :- जर तुम्हाला कोणत्याही थंड पदार्थांची ऍलर्जी असेल तर कच्चा कांदा खाणे टाळावे. कारण, अशा परिस्थितीत जर तुम्ही कांदा खाल्ला तर तुमची समस्या आणखी वाढू शकते.

५. या गोष्टी लक्षात ठेवा :- उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अधिक फायदेशीर असते. कारण त्याचा परिणाम थंडावा देणारा असतो आणि त्यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात, कांदा खाल्ल्यावर त्याचा त्रास होऊ नये म्हणून कच्चा कांदा नेहमी व्हिनेगरसोबतच खावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकांदाअन्न