Turmeric Side Effects : हळद किंवा हळदीचं दूऱ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला देत असतात. हळदीमध्ये आढळणारे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण दुधासोबत मिळून शरीराला खूप फायदे देतात. हेच कारण आहे की, फार पूर्वीपासून अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीच्या दुधाचं सेवन केलं जातं. पण अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी हळदीचं दूध नुकसानकारक ठरू शकतं. अशात कुणी हळदीच्या दुधाचं सेवन करू नये हे जाणून घेऊ.
कुणी टाळावी हळद?
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला
जर आपण गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर आपण कच्ची हळद अजिबात खाऊ नये. कच्ची हळद खाल्ल्यानं हार्मोन्समध्ये असंतुलन होऊ शकतं. ज्यामुळे गर्भाशयाचं नुकसान होण्याचा धोका असतो. तेच जर आपण स्तनपान करत असाल तर बाळालाही समस्या होऊ शकतात.
लिव्हरसंबंधी समस्या
हळदीचं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. हिवाळ्यात तर याचं भरपूर सेवन केलं जां. पण ज्या लोकांना लिव्हरसंबंधी समस्या आहे, त्यांच्यासाठी हे दूध नुकसानकारक ठरू शकतं. हळदीमध्ये करक्यूमिन तत्व आढळतं. जे लिव्हरसाठी नुकसानकारक असतं. अशात ज्या लोकांना लिव्हरसंबंधी समस्या आहे त्यांनी हळद टाळली पाहिजे.
उलटी, जुलाब आणि मळमळ
हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं. त्यामुळे जे लोक रोज हळदीच्या दुधाचं सेवन करतात त्यांना जुलाब, उलटीची समस्या होऊ शकते. या दुधाचं रोज आणि जास्त प्रमाणात सेवन करू नये.
आयर्नची कमतरता असेल तर...
रोज हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात आयर्नची कमतरता होऊ शकते. कारण हळदीमध्ये आढळणारे तत्व आयर्नच्या अवशोषणात अडथळा निर्माण करतात. याच कारणाने रोज हळदीचं दूध पिणाऱ्या व्यक्तींना आयर्नच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.
गॉलब्लॅडरची समस्या
हळदीमध्ये असलेल्या करक्यूमिन तत्वाचा गॉलब्लॅडरवर वाईट प्रभाव पडतो. हळदीमुळे गॉलब्लॅडर आकुंचन पावतं, ज्यामुळे ब्लॅडर रिकामं होतं. अशात आपण हळदीचा वापर कमीच केला पाहिजे.