Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कांदा करु शकतो तुमच्या तब्येतीचा वांधा, पाहा कच्चा कांदा कुणी खावा-कुणी कधीच खाऊ नये..

कांदा करु शकतो तुमच्या तब्येतीचा वांधा, पाहा कच्चा कांदा कुणी खावा-कुणी कधीच खाऊ नये..

Onion Common Side Effects: एक गोष्ट अशीही लक्षात घ्यायला हवी की, कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी तो नुकसानकारकही ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:49 IST2026-02-12T10:36:26+5:302026-02-12T17:49:58+5:30

Onion Common Side Effects: एक गोष्ट अशीही लक्षात घ्यायला हवी की, कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी तो नुकसानकारकही ठरू शकतो.

Who should avoid eating raw onions dietitian reveals | कांदा करु शकतो तुमच्या तब्येतीचा वांधा, पाहा कच्चा कांदा कुणी खावा-कुणी कधीच खाऊ नये..

कांदा करु शकतो तुमच्या तब्येतीचा वांधा, पाहा कच्चा कांदा कुणी खावा-कुणी कधीच खाऊ नये..

Onion Common Side Effects: उन्हाळ्याची चाहूल लागली असून बरंच गरम व्हायला लागलं आहे. भरपूर घाम यायला लागलाय. रात्री आणि सकाळी पडणारी थंडीही सुद्धा कमी झाली असून फॅनची पॉवर आता वाढवायला सुरूवात झालीये. तापमान वाढायला लागलं की, एक फारच कॉमन गोष्ट बघायला मिळते. ती म्हणजे जेवणासोबत कच्चा कांदा खाणं. जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात भरपूर कच्चा कांदा खातात. याने जेवणाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यातून अनेक पोषक तत्वही मिळतात. असंही नाही की, लोक केवळ उन्हाळ्यातच कच्चा कांदा खातात. इतर वेळीही लोक कांदा खातात. पण एक गोष्ट अशीही लक्षात घ्यायला हवी की, कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी तो नुकसानकारकही ठरू शकतो. अशात जाणून घेऊया की, कुणी कच्चा कांदा खाणं टाळलं पाहिजे आणि खाल्लाच तर त्यांना काय समस्या होऊ शकतात.

कांद्यातील पोषक तत्व आणि त्यांचे फायदे

कांद्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ज्यात अँटी-ऑक्सीडेंट्स, सल्फर, फ्लेवोनॉइड्स आणि फायबर यांचा मुख्य समावेश आहे. कांदा खाल्ल्याने हृदय ठणठणीत राहतं, इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि शुगर लेव्हलही कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्याशिवाय कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. पचनक्रियाही सुधारते.

कांदा खाणं कुणी टाळावं?

डायटिशिअन सांगतात की, कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि सल्फर असतं. या तत्वांनी पचनास मदत होते खरी, पण ज्यांना आधीच गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा पोटात अल्सरची समस्या आहे त्यांच्यासाठी कच्चा कांदा नुकसानकारक ठरू शकतो. याने पोटात जळजळ, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि जडपणा जाणवू शकतो. अशा लोकांना नेहमी सल्ला दिला जातो की, त्यांनी कांदा शिजवून किंवा हलका भाजून खावा.

एक्सपर्ट सांगतात की, कांद्याने ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते. पण जास्त प्रमाणात खाल्ला तर डायबिटीसच्या रूग्णांची शुगर लेव्हल अचानक कमी होऊ शकते. इतकंच नाही तर काही लोकांना कच्च्या कांद्याने हायपोग्लायसीमिया सारखी समस्याही होऊ शकते. त्यामुळेच डायबिटीसच्या रूग्णांनी कांदा खाण्याचं प्रमाण वाढवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

काही लोकांना अ‍ॅलर्जी होऊ शकते

काही लोकांना कांदा खाल्ल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते. ही अ‍ॅलर्जी त्वचेवर रॅशेज, सूज किंवा डोळ्यांमध्ये जळजळ या स्वरूपात असू शकते. कच्च्या कांद्याला स्पर्श केला तरी जळजळ किंवा लाल चट्टे काही लोकांना येऊ शकतात. जर कुणाला आधीच अ‍ॅलर्जीची समस्या अशेल किंवा त्यांनी कांदा खाल्ल्यावर अशी लक्षणं दिसली तरी त्यांनी लगेच कांदा खाणं बंद केलं पाहिजे.

रक्त पातळ करण्याचं औषध घेणारे

एक्सपर्ट असंही सांगतात की, जे लोक रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं घेत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा कांदा घातक ठरू शकतो. कांद्यामध्ये रक्त पातळ करण्याची क्षमता असते, ज्यामुळे ब्लीडिंगची समस्या वाढू शकते. उदाहरण द्यायचंच झालं तर काही इजा झाली असेल तर रक्तस्त्राव जास्त होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कांदा खावा. तसेच हर्निया किंवा लिव्हरची समस्या असणाऱ्या लोकांनी सुद्धा कांदा कमी प्रमाणात खावा.

Web Title : कच्चा प्याज: फायदे और नुकसान; किसे इससे बचना चाहिए?

Web Summary : कच्चा प्याज स्वास्थ्य के लिए फायदेमंद है, लेकिन कुछ लोगों को इससे बचना चाहिए। एसिडिटी, मधुमेह, एलर्जी या रक्त पतला करने वाली दवा लेने वालों को सावधानी बरतनी चाहिए। इससे पाचन संबंधी समस्याएं, ब्लड शुगर में उतार-चढ़ाव या एलर्जी हो सकती है।

Web Title : Raw Onion: Benefits and Risks; Who Should Avoid It?

Web Summary : Raw onions offer health benefits, but some should avoid them. Those with acidity, diabetes, allergies, or on blood thinners should exercise caution. It may cause digestive issues, blood sugar fluctuations, or allergic reactions.